11:48pm | Sep 25, 2022 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये घरफोडींच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच आज रात्री उशिरा मलवडी, ता. फलटण येथे अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार करत सराफाला लुटले. सुमारे २० लाख रुपये किमतीच्या तब्बल ४० तोळे सोन्यासह रोख रक्कम घेऊन दरोडेखोरांनी पलायन केल्यामुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये घरफोडींच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. चोरटे बंद घरांना लक्ष करत हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेत असताना आज रविवारी रात्री मलवडी, ता. माण येथील एक सराफ आपले दुकान बंद करून घरी जात असताना काही अज्ञात दरोडेखोर त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी गोळीबार करत त्या सराफाकडुन २० लाख रुपयांचे ४० तोळे सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. सुदैवाने दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेची माहिती जिल्हा पोलीस दलाला मिळतात अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून ते रात्री साडेअकरा वाजता मलवडी येथे पोहचले आहेत. या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही मलवडी येथे दाखल झाले असून काही वेळातच पथकाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून सूत्रांच्या म्हणण्यानुसार दरोडेखोर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या टप्प्यात असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होत आहे. गेल्या काही दिवसांमधील माण तालुक्यातील ही सर्वात मोठी घटना समजली जात असून दरोडेखोरांनी संबंधित सराफाची संपूर्ण माहिती काढून दुकानाची रेकी करून हा दरोडा टाकला असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ
गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये चोरींच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे स्पष्ट होते. चोरटे प्रामुख्याने बंद घरे लक्ष करीत आपला डाव साध्य करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या एका बंगल्याला लक्ष करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. सातारा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांनी दिवस-रात्र गस्तींवर भर देण्यासह चोरीच्या घटनांना अटकाव करावा, अशी मागणी होत आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |