03:06pm | Sep 29, 2020 |
पुसेगाव: गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसेगाव परिसरातील बटाटा पीकांची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली आहे. बहुतांश शेतकर्यांनी बटाटा काढणीस प्रारंभ केला असला तरी बटाटा नासण्याचे प्रमाण अधिक असल्याने बटाटा उत्पादनात 60 ते 70 टक्के घट झाली आहे. परिणामी शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.
सुरुवातीच्या काळात बटाटा, घेवडा, सोयाबीन व आल्याची मोठी लागवड पुसेगाव परिसरात करण्यात आली. खाऊ बटाट्याबरोबरच शेतकर्यांनी वेफर्ससाठी लागणार्या एटीएल, 1533, एफसी-3 या बटाटा वाणांचीही मोठ्याप्रमाणात लागवड केली. मध्यंतरी हवेतील अतीउष्णता व संध्याकाळचा अतीपाऊस यामुळे बटाटा मोठ्या प्रमाणात सडून गेला आहे. पण काढणीच्यावेळी अतीपावसामुळे जमीनीला वापसा नसल्याने बटाटा काढणीला विलंब होत आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे काही अशी बटाटा पिकांची काढणी सुरू झाली आहे. परंतु अतिपावसाचा फटका बसल्याने प्रति क्वींटल 12 ते 15 क्विंटल एवढा उतारा अपेक्षित असताना केवळ पाच ते सहा क्विंटल एवढाच उतारा पडत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने येथील शेतकर्यांनी बटाटा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. दोन पोत्यांपासून ते दोनशे पोत्यांपर्यंत शेतकर्यांनी बटाटा लागवड केली आहे. बटाटा पिकासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी असा एकूण एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च होतो. यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे या भागातील शेतकर्यांनी अडीच ते तीन महिन्यांपूर्वी बटाटा पिकाची लागवड केली होती. सुरवातीला पिकास पोषक वातावरण होते. मात्र पीक पोसण्याच्या आणि काढणीच्या महत्त्वाच्या कालावधीत अतिपाऊस झाल्याने या पिकास मोठा फटका बसला आहे. बटाट्याबरोबरच आले पिकातही कंदकुजेचा मोठा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनामुळे वेफर्स कंपन्या अद्याप सुरु नसल्याने व्यापारी वेफर्सचा बटाटा खरेदी करण्यास तयार नाहीत. करोनाच्या संसर्गामुळे सध्या सर्वत्र मजुरांचीही मोठी टंचाई भासत आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे पुन्हा मोठापाऊस झाला, तर बटाटा काढणीची कामे काही दिवसांसाठी ठप्प होतील. काढणीला आलेला बटाटा हा वेळेत काढला नाही तर बटाटा पिकास धोका निर्माण होऊ पिक हातचे जाण्याची भिती असल्याने शेतकरी व कुटूंबातील लोक शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करून वेळेतच बटाटा काढण्यात मग्न आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |