02:51pm | Jun 14, 2022 |
अयोध्या : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्या दौऱ्यावर स्वागत केले आहे. राज ठाकरे यांना असणारा विरोध कायम असून, आदित्य ठाकरे यांना कोणीही विरोध करणार नाही, असे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
तो पर्यंत त्यांना इथे येऊ देणार नाही
आम्हाला माहिती आहे की, आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांना कोणीही विरोध करणार नाही. त्यांना कोणत्याही मंदिरात जायचे असल्यास कोणीही विरोध करणार नाही. विरोध फक्त एकाच व्यक्तीला आहे, ज्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. राज ठाकरे यांच्या कुटूंबातील त्यांची आई, पत्नी, मुलगा आल्यास त्यांनी मी माझ्या घरी त्यांना आमंत्रित करेन. पण राज ठाकरे माफी मागत नाहीत तो पर्यंत त्यांना इथे येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.
बृजभूषण सिंह संजय राऊत यांना भेटणार
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची अयोध्येत भेट होणार आहे. शरयू नदीच्या किनारी संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह आणि संजय राऊत यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत. ठाण्याहून काही शिवसैनिक अयोध्याला रेल्वेने रवाना झाले. आदित्य ठाकरे १५ जून रोजी सकाळी ११ वाजता लखनऊ विमानतळावर उतरतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते अयोध्येमध्ये जातील.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |