12:28pm | Mar 04, 2021 |
अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत पुन्हा एकदा इंग्लंडच्या डावाची खराब सुरूवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला खरा परंत पहिल्या सत्रामध्येच इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आहेत.
अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकल्याने इंग्लंडचे दोन्ही सलामीवीरांना तंबूत परतले आहेत. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसर्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर डॉमिनिक सिब्ले याला अक्षरने त्रिफळाचीत केलं. त्याने फक्त दोन धावा काढल्या, सिब्लेच्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर जॅक क्रॉले यालाही अक्षरने मोहम्मद सिराजच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं. क्रॉलीने 9 धावा केल्या. त्यानंतर मैदानात जॉनी बेयरस्टो आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांची जोडी खेळत होती. पण मोहम्मद सिराजने कर्णधार जो रुटला पाच धावांवर पायचीत करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. सध्या 56 धावांवर इंग्लंडचे तीन खेळाडू माघारी परतले आहेत.
दरम्यान, मोटेराच्या अनुकूल खेळपट्टीवर गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटीत फिरकीच्या बळावर वर्चस्व गाजवून इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्यापेक्षा लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे सध्या 2-1 अशी आघाडी असून, जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंडला भिडण्यासाठी अखेरची कसोटी किमान अनिर्णीत राखण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यासाठी थेट पात्र ठरेल.
सामना अनिर्णीत राखणे हा सुरक्षित पर्याय असला तरी आक्रमक वृत्तीच्या कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हा बचावात्मक पर्याय मुळीच मान्य नाही. मोटेरावर तिसर्या कसोटीत गुलाबी चेंडूनिशी खेळताना भारताने दोन दिवसांत इंग्लंडला नामोहरम केल्यानंतर खेळपट्टीवरून खडाजंगी रंगली. मालिकेतील अखेरचा सामना इंग्लंडने जिंकल्यास त्यांना प्रतिष्ठा टिकवता येईल, परंतु भारताने गमावल्यास मानहानीकारक ठरेल.
संघ
* भारत : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर) , आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा.
* इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिब्ले, जॅक क्रॉले, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, डी लॉरेन्स, बेन फोक्स, डॉमनिक बेस, जॅक लीच, आणि जेम्स अँडरसन.
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |
दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू |