12:34am | Jul 04, 2020 |
सातारा : कृष्णा सिंचन विभागातील चार्ल्स शोभराज उर्फ पी.डी. जाधव या लिंगपिसाट कार्यकारी अभियंत्यावर सहकारी महिला अधिकारी-कर्मचार्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला तत्काळ सेवेतून बडतर्फ करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, कृष्णा सिंचन विभाग सातारचा कार्यकारी अभियंता पी.डी. जाधव याच्याविरोधात दोन धाडसी महिला कर्मचार्यांनी विनयभंगाचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात त्रास सहन न झाल्याने दाखल केला आहे. दि. 15 जानेवारी 2020 रोजी या दोन महिलांनी अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्याकडे लेखी तक्रार करून दाद मागितली होती. डोईफोडे यांनी जाणीवपूर्वक आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी या गंभीर तक्रारीची एक ते दीड महिना दखलच घेतली नसल्याचे समजते. या संदर्भात न्याय मिळत नसल्याने या महिलांनी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे दाद मागितल्याने कार्यकारी अभियंता पी.डी. जाधव यांच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकार्याची नियुक्ती करण्याऐवजी उपअभियंता यांची समिती नेमून पी. डी. जाधव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
या गंभीर तक्रारी पीडित महिला अधिकारी-कर्मचार्यांनी पाटबंधारे राज्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर अधीक्षक अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली. वास्तविक कृष्णा सिंचन विभागात महिला तक्रार निवारणासाठी विशाखा समितीची निर्मिती डोईफोडे यांनी या तक्रारीची दाखल होण्यापर्यंत केलीच नव्हती. ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
पी. डी. जाधव यांची 21 वर्षे शासकीय नोकरी झाली असून त्यापैकी 18 वर्षे ते सातारा जिल्ह्यातच कार्यरत आहेत. त्यांचे जन्मगाव सातारा तालुक्यात असल्याने राजकीय नेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध आहेत. त्यामुळेच एवढी वर्षे त्यांची नोकरी सातार्यात होऊ शकली. त्यांचा पाटबंधारे विभागात मोठा दबदबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चतुर्थ कर्मचार्यांपासून वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत त्यांना कोणीही विरोध करत नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. ज्या दोन महिला कर्मचार्यांनी हे धाडस दाखवले आणि जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्या मुलींच्या जीविताला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. दाखल झालेल्या गुन्ह्यात अडथळे निर्माण होऊन राजकीय दबाव येऊ शकतो.
यापूर्वी महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनावर दबाव आणण्यासाठी कृष्ण सिंचन विभागाच्या अन्य शाखेतील अधिकारी कर्मचारी सातार्यात आले होते. वास्तविक महिलांची विनयभंगाची तक्रार असताना कर्मचार्यांनी त्या मुलीच्या मागे उभे राहण्याऐवजी जाधव यांच्यासाठी शासकीय कामकाज सोडून येण्याची गरज नव्हती. जे कर्मचारी तीन किलोमीटर पेक्षा बाहेर आहेत त्यांचीही या निमित्ताने चौकशी केली जावी.
यामध्ये महिलांची गंभीर तक्रार बासनात गुंडाळून ठेवणारे अधीक्षक अभियंता डोईफोडे यांचीही त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. या तपासात त्यांच्याकडूनही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित मुलींच्या संरक्षणासाठी पी.डी. जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तर अधीक्षक अभियंता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले तरच या मुलींच्या व्यतिरिक्त अन्य महिला कर्मचारीही बिनधास्तपणे अशाप्रकारे झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून धाडसाने तक्रार देण्यासाठी पुढे येतील. मुलींनी दाखल केलेल्या गंभीर गुन्हाचा रिपोर्ट पोलीस यंत्रनेने संबंधित विभागाला तातडीने दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |