06:45pm | Mar 07, 2021 |
सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील कोविड-19 अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. दि. 1 मार्च 2021 पासून संपुर्ण देशात, राज्यात व सातारा जिल्ह्यातही 60 वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांना व 45 ते 59 वर्ष वयोगटातील कोमोर्बीड आजार (हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार इ.) व्याक्तिंना कोविड-19 चे मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील या वयोगटातील लाभार्थींना कोविड लसीकरणाचा लाभ मिळण्याकरिता नागरिकांनी https://seilfregistration.cowin.gov.in या लिंक चा वापर करुन आपल्या नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तिनां ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्राच्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा व विजय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी केले आहे.
दि. 8 मार्च 2021 पासून सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये व 65 प्राथमिक आरोग्य केंद्र 79 शासकीय व 10 खाजगी ठिकाणी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय, सातारा उप जिल्हा रुग्णालय कराड व फलटण. ग्रामीण रुग्णालय मेढा, महाबळेश्वर, खंडाळा, दहिवडी, वडूज, कोरेगांव, ढेबेवाडी, पाटण, मिशन हॉस्पीटल वाई, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रा.आ. केंद्र (ठोसेघर ता. सातारा, येवती ता.कराड, केरळ, मुरुड, सळवे, सणबुर, सोनवडे ता.पाटण ही ठिकाणे वगळून) व नागरी आरोग्य केंद्र गोडोली, कस्तुरबा ता. सातारा व कराड या शासकीय रुग्णालयामध्ये सकाळी 10 ते सांय. 5 या वेळेत कोविड-19 चे लसीकरण मोफत देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत खाजगी आरोग्य संस्थामध्ये ॲन्को लाईफ सेंटर तामजाईनगर सातारा, संजीवन हॉस्पीटल सातारा, कृष्णा हॉस्पीटल कराड, सह्याद्री हॉस्पीटल कराड, शारदा हॉस्पीटल कराड, गुजर मेमोरियल हॉस्पीटल कराड, मानसी मेमोरियल हॉस्पीटल खंडाळा, पाटील हॉस्पीटल कोरेगाव, मंगलमुर्ती क्लिनिक सातारा, घेाटवडेकर मेमोरियल हॉस्पीटल वाई, या ठिकाणी रुपये 250 प्रती डोस प्रमाणे शुल्क घेऊन लस देण्यात येणार आहे.
वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिकांना व 45 ते 59 वर्ष वयोगटातील कोमोर्बीड आजार (हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार इ.) व्याक्तिंना कोविड-19 चे मोफत लसीकरण करुन घेणेबाबत डॉ.अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी आवाहन केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |