04:03pm | Apr 14, 2021 |
कोल्हापूर: व्हॉअस्अॅपवर मजकूर पोस्ट करून एका पोलिस निरीक्षकाने झोपेच्या गोळ्या खावून वारणा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. वरिष्ठांकडून होणार्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगण्यात आले. या सार्या प्रकारामुळे कोल्हापूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रदीप काळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या पोलीस अधिकार्याचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअॅपवर मजकूर पोस्ट केला. वरिष्ठांकडून होणारा छळ सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर वारणा नदीत उडी घेतली. काळे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कोल्हापूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, फेब्रुवारीत नवी मुंबईत एपीएमसी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनीही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. डिसेंबर 2020मध्ये अशाच प्रकारची एक घटना तुळींज पोलीस ठाण्यात घडली होती. तेथील कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून काम करत होते. तीन महिन्यांपूर्वी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उजळाईवाडी विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून ते मानसिक तणावात होते. आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज सकाळी त्यांनी अधिकार्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर टाकला. अधिकार्यांनी तो मेसेज पाहताच त्यांची भंबेरी उडाली. तातडीने सर्वांनी त्यांचा शोध सुरू केला. पण, त्यांनी मोबाइल स्वीच ऑफ केल्याने शोध घेण्यात अडचण येऊ लागली.
पोलिसांनी काळे यांच्या मोबाइल लोकेशनची माहिती घेतल्यानंतर, ते वारणा नदीच्या काठावर असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी वारणा नदीत उडी मारल्यानंतर तेथे असलेल्या काहींनी त्यांना वाचवले. मात्र, ते बेशुद्धावस्थेत होते. पोलिसांनी त्यांना प्रथम कसबा बावडा येथील सेवा दवाखान्यात दाखल केले. नंतर एका खासगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. त्यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेने पोलीस दल हादरले आहे. काळे अजूनही बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांचा जबाब घेता आला नाही. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे काळे यांनी व्हाट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |