09:15pm | Sep 24, 2021 |
सातारा : कोरोना काळात बंदी घातलेल्या चित्रपट, नाटय, तमाशा कलावंतांनाही कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी (माहिती अधिकार) संस्थापक-अध्यक्ष, पंचम टेलिव्हिजन अँड ब्रॉडकास्टिंग नेटवर्क संस्थेचे महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.
कोरोना काळामध्ये शासनाने सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू केलेले असताना फक्त कलावंतांच्या कार्यक्रमांना, चित्रपट मालिका निर्मिती, थिएटर, नाट्य प्रसारण आदींना शासनाने परवानगी नाकारून त्यावर अवलंबून असणार्या हजारो नागरिकांवर उपासमारीची व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येची वेळ आणली आहे. सध्या हा व्यवसाय व त्यावर अवलंबून असणारे लाखो तंत्रज्ञ वेठबिगार होण्याच्या स्थितीत आहेत. लाखो रुपये खर्च करून बांधलेली राज्यातील जवळपास एक हजार थिएटर धारकांचा व्यवसाय मरणपंथाला लागला आहे. राज्य सरकारच्या हट्टापायी या व्यवसायाचे जवळपास चारशे कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान होत आहे. इतर राज्यांमध्ये या व्यवसायाला त्या-त्या सरकारने परवानगी दिली आहे. मग महाराष्ट्र सरकार परवानगी का देत नाही ? आजघडीला संबंधित व्यवसायाशी निगडीत लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. असे असताना या कलावंतांनी आणि त्यांच्या परिवारांनी आत्महत्या करायची का? संविधानात नागरिकांना जगण्याचा मुलभूत हक्क दिला असताना या जगण्यासाठी ज्या कलांवंतांनी आपल्या पदरी कला जोपासली ती अशी खितपत पडण्यासाठी का? ज्या कलेच्या जिवावर त्यांनी जगायचे, त्या कले वर बंदी घातल्यानंतर या कलावंतांनी जगण्यासाठी काय करायचे? असा प्रश्न सध्या कलाक्षेत्रातील लोकांना पडलेला आहे. सार्वजनिक सेवा. रेस्टॉरंट आणि बाजारपेठांमध्ये लोक एकमेकांच्या संपर्कात सहज येत आहेत. मग थिएटर धारकांना 50 टक्के क्षमतेवर थिएटर सुरू करण्यास परवानगी का नाही ? त्यामुळे शासनाने सर्व प्रकारच्या चित्रपट, तमाशा, नाट्य इत्यादी कला क्षेत्रातील व्यवसायाला त्वरित परवानगी द्यावी व त्यांच्यावर येणारी उपासमारीची येणारी वेळ थांबवावी, अशी मागणी महारूद्र तिकुंडे (माहिती अधिकार) संस्थापक-अध्यक्ष, पंचम टेलिव्हिजन अँड ब्रॉडकास्टिंग नेटवर्क संस्था यांनी केली आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |