06:10pm | Nov 27, 2020 |
वाई : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झालेली असताना आणि आवश्यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत असल्या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रिलायन्स इन्फ्रा यांच्याविरोधात टोल विरोधी घोषणा देत टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करत निदर्शने केल्याच्या कारणावरून दाखल गुन्ह्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सतरा जणांना आज वाई न्यायालयाने जामीन मंजूर केला.
दि १८डिसेंबर २०१९ रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्यावर सातारा बाजूकडून विरमाडे (ता. वाई).गावाकडे टोलनाक्याचे लेन क्रमांक एक च्या बाजूस कठड्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र उर्फ जयंत दादा चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते आणि ८० लोकांनी, टोलनाक्यावर टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करत, टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली व साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला. म्हणून पोलीस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याकामी सुनावणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतरांवर वेळोवेळी समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व संशयित १७ जण न्यायालयात उपस्थित राहिले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पाच हजाराच्या जातमूचलक्यावर शिवेंद्रसिंहराजेंना न्यायालयाने जमीन मंजूर केला. शिवेंद्रसिंह व इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुंखे, संग्राम मुंडेकर, प्रसाद जोशी यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |