08:54pm | Apr 10, 2021 |
सातारा : कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोटर सायकली चोरणार्या टोळीतील तिघांना कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. अटक केलेल्या तिघांकडून चोरीच्या 11 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
प्रदिप तानाजी सोमोशी (वय 24, रा. आमनापूर रोड, पलूस कॅनॉल जवळ, पलूस, ता. पलूस), राजू रामचंद्र जाधव (वय 23, रा. भारती विद्यापीठ शेजारी, ता. पलूस), प्रशांत वसंतराव जाधव (वय 35, रा. सांडगेवाडी, ता. पलूस) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत होणार्या मोटर सायकल चोरीच्या अनुषंगाने गुन्हे उघड करण्याकरीता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पथक कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत व परिसरात मोटर सायकल चोरांचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक संजय जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पलूस येथील मोटर सायकल चोरांनी कृष्णा हॉस्पिटल समोरुन बर्याच मोटर सायकल चोरी करून विटा, ता. खानापूर येथे विकलेल्या आहेत. त्यानुसार कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार जयसिंग राजगे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, मारुती लाटणे यांचे विशेष पथक तयार करून अधिक तपास केला असता पलूस येथील चौघांनी कराड, बहे बोरगाव, आरग बेडग अशा विविध ठिकाणाहून मोटर सायकलींची चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. या तिघा संशयितांचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र या टोळीतील आणखी एकजण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी करून आरोपींच्या ताब्यातून एकुण 11 चोरीच्या मोटर सायकली जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, स.फौ. सतीश जाधव, पो. हवा. नितीन येळवे, जयसिंग राजगे, पो. ना. संजय जाधव, सचिन साळुखे, तानाजी शिंदे, पो.कॉं. मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांनी केली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |