06:40pm | Sep 24, 2021 |
सातारा : सहकारी बँकिंग क्षेत्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात नामांकित बँक असून या बँकेने जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीने केलेल्या निरनिराळ्या योजना व विक्रमी वसुली कार्यप्रणाली देशातील सहकार क्षेत्रास दिशादर्शक आहे असे प्रतिपादन आंध्रप्रदेश स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक सुरेन बाबू यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दैदित्यमान व दिशादर्शक असलेली कार्यप्रणाली व विकास सेवा संस्था सक्षमीकरणासाठी बँक करीत असलेल्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी आंध्रप्रदेश स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक व आंध्रप्रदेश मधील निवडक जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने बँकेस भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते. या शिष्टमंडळात आंध्रप्रदेश स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक श्रीमती अश्विनी, श्रीमती लावण्या, व्ही.रमण तसेच आंध्रप्रदेश राज्यातील पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होते.
यावेळी जिल्हा बँकेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून बँकेच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती घेताना बँक रिजर्व्ह बँक व नाबार्डचे नियमांचे तंतोतंत पालन करून कामकाज करीत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या ३२० शाखा आणि शाखासलग्न ९५४ सोसायट्याच्या माध्यमातून सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क असून बँकेच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी बँक सदैव प्रयत्नप्रयत्नशील आहे. बँक स्थापनेपासून सतत नफ्यात असून बँकेची वसुली ९९ टक्कया पर्यंत आहे आणि, सतत १५ वर्ष बँकेचा निव्वळ एन.पी.ए शून्यटक्के आहे. हि बाब विशेष उल्लेखनीय असलेचे गौरवोद्गार आंध्रप्रदेश स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक, श्रीमती अश्विनी यांनी काढले.
त्यांनी बँकेने उभारलेल्या डेटा सेंटरला तसेच बँकेने अर्थसहाय्य केलेल्या बोरगाव ता. सातारा येथील जानकी कृषी पर्यटन केंद्र व नागठाणे विकास सेवा सोसायटी ता. सातारा आणि कृषीभूषण मनोहर साळुंखे यांच्या प्रगतीशील शेती फार्मला भेट देऊन, जिल्हा बँकेच्या अर्थसहाय्याने केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची माहिती घेतली. सातारा जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना रु.३.०० लाखापर्यंत शून्य टक्के पीक कर्ज, शेतकऱ्याच्या मुलांनाशून्य टक्के दराने शैक्षणिक कर्ज, ग्राहकांना तत्पर सेवा देणेसाठी सीबीएस कार्यप्रणाली आणि डिजिटल बँकिंग सुविधा, दुर्गम भागात बँकिंग सुविधा देणेसाठी मोबाईल ATM व्हॅन, सर्व से.ठेव खातेदारांना २ लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण तसेच शासन पुरस्कृत विविध बँकिंग योजना प्रभावीपणे राबवून बँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष मा.आ.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले व बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राज्याचे सहकार व पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचे सह सर्वमा. संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी बँकेचे उपव्यवस्थापक महेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक वाय.जे.साळुंखे व एस.व्ही.शिंदे यांनी स्वागत केले. उपव्यवस्थापक संदीप शिंदे यांनी वसुली कामकाजाची माहिती दिली. तर उपव्यवस्थापक जयवंत पवार यांनी आभार मानले.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे सर्व उपव्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |