06:16pm | Sep 12, 2021 |
सातारा : किडगाव, ता. सातारा येथे वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची शेतातील मोटारींची बोगस बिले छापून व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसबीलाचे तुकडे करुन सरकार आणि कारखानदार यांचेकडून फसवणूक केली जात आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केले.
नेले किडगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेळके बोलत होते. यावेळी राजू केंजळे जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अर्जुन साळुंखे राज्य कार्यकारणी सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच मनोहर येवले, संजय जाधव, सातारा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश पिसाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शेळके म्हणाले, संपूर्ण सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मोटारीची वीजबिले बोगस दिली जात असून त्याची वसुली करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून दबाव टाकला जात आहे. या दबावाला शेतकऱ्यांनी बळी न पडता शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवे. शेतकऱ्यांची लाईट तोडू नये, असा कायदा आहे. अन्नधान्य पिकवणारा शेतकरी असून राष्ट्रीय अन्नधान्याचा पुरवठा करणारा तो राजा आहे. या राजावर जर कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. वीज वितरण कंपनीकडून मनमानी लाईट बिले पाठवली जात असून त्याच्यावर 21 टक्के व्याज आकारणी केली जात आहे. शेतकऱ्यांनी जागृत होण्याची आवश्यक असून आत्तापर्यंत आपण वीज वितरण कंपनीला किती पैसे भरले, त्याच्यातून शासनाने किती पैसे भरले याचा आपण हिशोब मागणे गरजेचे आहे. जर कंपनीने आपणास हिशोब दिला तरच आपण लाईट बिल भरू शकतो असे ठणकावून सांगा. पावसाळ्याच्या चार महिन्यात शेतातील सर्व मोटारी बंद असतात. अशावेळीही लाईट बिले दिली जातात. शेतातील लाईट बिलातून 67% लाईट बिल शासन भरत असते. उरलेले 33 टक्के लाईट बिल शेतकऱ्यांनी भरावयाची असते. मात्र याच शेतकऱ्याला आठवड्यातील चार दिवस रात्रीची लाईट देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. तर दिवसा आठ तास लाईट देऊन त्याच्यातील वेगवेगळी कारणे देऊन लाईट वारंवार खंडित केली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला असून शेतकरी संघटीत झाला तरच वाचू शकतो. तसेच केंद्र व राज्य सरकार या दोघांनी मिळून 'एफआरपी'चे तीन तुकडे करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केलाय. संघटनेने प्रसंगी रक्त सांडुन एक रकमी 'एफआरपी'चा कायदा शेतकऱ्यांना मिळवून दिला. पण दोन्ही सरकारनी मिळून या कायद्याला मुठमाती दिली. शेतकऱ्यांनी राजकारण बाजुला ठेवुन याला विरोध केला पाहीजे. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आगामी काळात मोठे आंदोलन या विरोधात उभे करणार आहे.
थकीत ऊसबिल व एफ आर पी चे तुकडे या विरोधात सुध्दा सडेतोड भुमिका त्यांनी मांडली व एकजुटीने लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शेतकऱ्यांची उपस्थिती व उत्साह आणि स्वाभिमानी ची आभ्यासपुर्ण मांडणी यामुळे महावितरण व कारखानदार यांना हा विषय फार अवघड जाणार, असे दिसते व यांची जबर किंमत जिल्ह्यातील कारखानदार आणि महावितरण, सरकारला मोजावी लागेल.
यावेळी मोठ्या संख्येने किडगाव व विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने एकवटले होते व सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला.
कार्यक्रमास नेले विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय पाटील, बाळासाहेब पाटील, किडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष टिळेकर, संतोष इंगवले, राजहंस घोलप, हिंदुराव शिर्के, हणमंत टिळेकर, देवेंद्र ढेंबरे, अशोक टिळेकर, विजय इंगवले, सयाजी इंगवले, सचिन पाटील, निलेश चोरगे, संदीप ढेंबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच इंद्रजीत ढेंबरे यांनी केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |