03:30pm | Sep 28, 2021 |
सातारा : जिल्ह्यात काही दिवसांपासून स्त्रिया-मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यानुषंगाने हे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, याबाबतचे निवेदन रयतराज संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रात महिलांवर तसेच अल्पवयीन मुलीवर होणार्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. एकुणच या नराधम आरोपींवर कायद्याचा कसलाच वचक राहिलेला नाही. ज्या महाराष्ट्राला साधू - संतांचा वारसा लाभला आहे, जिथं छ. शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनी, संतांनी स्त्रीला मातेचा दर्जा दिला, तिचा सन्मान केला. त्याच स्त्रीवर, मातेवर ह्याच संतांच्या-महापुरुषांच्या भूमीत रोज बलात्कार होताहेत ही शरमेची बाब आहे. आज महाराष्ट्रात मुंबई, साकीनाका, उल्हासनगर, डोंबिवली, पुणे, अमरावती, जालना, जावळी, येनबुथला अशा विविध ठिकाणी अमानुषपणे महिलांवर अत्याचार, बलात्कार करून त्यांचा खून करणे, त्यांच्या अश्लील चित्रफित व्हायरल करणे, ब्लॅकमेल करणे अशा अनेक प्रकारचे गुन्हे आज ह्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडत असल्याने महिलांवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. पाठीमागच्या काळात सोनोग्राफीद्वारे गर्भ तपासणी करून मुलगी नको रे बाबा, म्हणून तिला जन्मालाच येऊ द्यायचं नाही अशी भूमिका काही पालकांची होती. म्हणूनच शासनाने कडक पावले उचलत गर्भलिंग निदान कायदा संमत केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे ही प्रकरण आटोक्यात आली. मात्र सध्या वारंवार होत असलेल्या स्त्रिया व मुलींवरील अत्याचारामुळे पालक भयभीत आहेत. मुलींना जन्माला घालून पुढे असे पहायला मिळत असेल तर त्या जन्माला घालायच्या का नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आज उपस्थित झाला आहे.
अशीच एक घटना 24 सप्टेंबर रोजी चाफळ, ता. पाटण येथे घडली. तेथे एका रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीवर एका माथेफिरूने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे सध्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. म्हणूनच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. अन्यथा याचे पडसाद सबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमटतील.
या निवेदनावर कुमार भोईटे, दत्तात्रय संकपाळ, सचिन मदने, राजू रणखंबे, बाबा शेलार, कृष्णा घोरपडे, संजय मदने, श्रीधर शिंदे, विकास खरात, विशाल सावंत, गजानन शिंदे, मंदार सावंत, उमेश सुतार, अनिल सावंत, प्रविण कांबळे, मयुर कांबळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |