12:52pm | Aug 13, 2022 |
सातारा : शाहूपुरीतील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघ या सामाजिक संस्थेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तिरंगा दौड आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या तिरंगा दौडच्या प्रारंभी गेंडामाळ, फाशीचा वड येथील हुतात्मा स्मारकास प्रथम संस्थेच्यावतीने संस्था अध्यक्ष भारत भोसले, शालाप्रुमुख सौ. एस. एस. क्षिरसागर यांनी अभिवादन केले. या अभिवादनानंतर संजय बारंगळे यांनी या हुतात्मा स्मारकाची पार्श्वभूमी सांगून वीर क्रांतीकारकांचे हे बलिदान व्यर्थ न जाण्याविषयी प्रत्येकाने भविष्यात आपले वर्तन देशहितकारक ठेवले पाहिजे, असे आवाहन केले. यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले.
भारतमाता की जय व वंदेमातरमच्या जयघोषाने सारा आसमंत दणाणून गेला होता. यानंतर तिरंगा दौडीस मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यां, नागरिकांसह महाविद्यालयीन युवक- युवतीसुध्दा बहुसंख्येने सहभागी झाले होते.सदरची तिरंगा दौड क्रांती सोसायटी-श्रीगणेश कॉलनी -यशवंतनगर-शिवाजीनगर- सुयोग कॉलनी - समता पार्क - जिल्हा परिषद कॉलनी -शाहूपुरी चौक - गेंडामाळ नाका ते पुन्हा हुतात्मा स्मारक अशी संपन्न झाली.
यावेळी नॅशनल कब्बडी खेळाडू केतकी सपकाळ, प्रांजली भोसले, प्रणाली भोसले,सावली गोसावी, आकांक्षा मोरे,साक्षी अहिरे, सुरेश शेटे, महेश जांभळे,शंतनू पवार,रोहण पवार, अजय भोसले, ऋषिकेश जांभळे, प्रविण दीक्षित ,संजय बारंगळे, जगदीश भोसले, मधुकर जाधव, अभय भोसले, नवनाथ कांबळे, जगदीश सुपेकर, सौ.प्रभावती निंबाळकर, सौ.गीता देसाई, चंद्रकांत देशमुख, दत्तात्रय कुचेकर,परशुराम भोसले, राजेंद्र सगरे व शाहूपुरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |