बुध: फलटण तालुका गुणवत्ता कक्षाची ऑनलाईन सहविचार सभा फलटण पंचायत समितीचे उपक्रमशील व प्रयोशील गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांचे अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटणचे अभ्यासु, संशोधक जेष्ठ अधिव्याख्याता जितेंद्र साळुंखे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत फलटण गट समूह साधन केंद्रामधील साधन व्यक्ती दमयंती कुंभार यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा विद्यानगर शाळेचे मुख्याध्यापक रवि परमाळे सर यांनी गत वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत केलेले नियोजन व कार्यवाही बाबत सविस्तर माहिती देऊन यशस्वी केलेल्या यशोगाथेचे सादरीकरण केले. निश्चय केला की, यशाचे मार्ग अनंत असतात. विश्वास, सातत्य, विद्यार्थी सहभाग, सचोटी या चतुसुत्री नुसार शैक्षणिक उपक्रमांमधून शिष्यवृत्ती परीक्षेत 100 टक्के निकाल व पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक झाले. यातील एकाचा जिल्ह्यातील ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक आला व राज्य शासनाच्या ग्रामीण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक आला.
सुनीता सस्ते यांनी कोविड-19 मधील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी केलेल्या अध्यापनामुळे मिळालेले यशाची यशोगाथा सादरीकरण केले. शैक्षणिक सर्वेक्षण व त्यासंबंधीचे विश्लेषण सादरीकरण फलटण गट साधन केंद्र मधील साधन व्यक्ती दमयंती कुंभार यांनी पीपीटी व आलेख याव्दारे केले. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
आनंददायी रचनात्मक शिक्षण व मनरेगामधून शालेय, भौतिक सुविधा यासंबंधी फलटण पंचायत समिती शिक्षण विभागामधील शिक्षण विस्तार अधिकारी चन्नन्या मठपती यांनी शासन निर्णय व परिपत्रके या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नियोजन करुन अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. प्रकल्प पद्धती, वाचनालय यांचा संग्रह करुन अंमलबजावणी करावी. स्वाध्याय, गोष्टीचा शनिवार, रिड टु मी अॅप डाऊनलोड करणे या शासनाच्या आदेशानुसार शाळांनी विविध विषयांवरील उपक्रमांमधून शैक्षणिक कामकाज करावे. रिड टु मी अॅप डाऊनलोड करणेत फलटण तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्याबद्दल केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी केंद्रप्रमुख अनिल कदम, गजानन शिंदे, दारासिंग निकाळजे, दादा चोरमले यांनी केंद्रातील विविध विषयांवरील उपक्रमांमधून शैक्षणिक कामकाजाचे सादरीकरण केले. याप्रसंगी फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी शैक्षणिक उपक्रम व गुणवत्ता विकास कार्यक्रम आढावा घेतला आणि शासन धोरण व निर्णय यांची सविस्तर माहिती दिली. फलटण तालुका शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात रोल मॉडेल बनावा यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केले. ग्यान फौंडेशनचे भालेराव यांनी शिक्षणात लोकसहभाग व समाज सहभाग देणारे शिक्षणप्रेमी यांचे कौतुक सोहळे घेणेबाबत मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख प्रमिला यंत्रे यांनी केले. सूत्रसंचलन केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी केले. याप्रसंगी विविध विभागांतील शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षक उपस्थित होते.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |