02:20pm | May 14, 2021 |
सातारा : राज्यात ज्याप्रमाणे लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी मतदान केंद्रनिहाय मतदान करून घेतले जाते, त्याच पद्धतीने लसीकरण करावे आणि त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रिपाई ए च्यावतीने दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. त्यामध्ये लॉकडाऊन, मायक्रोझोन, कंटेनमेंट झोन, मिनी लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन, संचार बंदी, जनता कर्फ्यू, मुख्यमंत्र्यांचा आदेश, पंतप्रधानाचा आदेश या ना, त्या गोष्टीमध्ये सर्वसामान्य जनता पिसली जात आहे. त्यामध्ये मजूर, कष्टकरी, पददलित व बाराबलूतेदार, गावकुसाबाहेर राहणारी अठरापगड समाज यांची होती नव्हती तेवढी पुंजी संपली आहे. सामान्य माणूस आर्थिक विषमतेने भरकटला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आर्थिक विषमतेने ग्रासलेले लोक बंड करतील, मग एका नविन क्रांतीचा जन्म होईल. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामुळे कष्टकरी वर्गाची, आई खाऊ देई ना, बाप भीक मागू देईना, अशी अवस्था होऊन बसली आहे. अशा वेळेस देशामध्ये अराजकता, भूकमारी करायची नसेल तर सरसकट लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक गोष्टींच्या निधीमध्ये कपात केली जात आहे. तीच कपात सरसकट लसीकरण करण्यासाठी वापरून लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी ज्याप्रमाणे मतदान केंद्रनिहाय जसे मतदान करून घेतले जाते, तसे लसीकरण करावे आणि त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे ‘नो कोरोना, नो लॉकडाऊन’ हाईल, अशी मागणी रिपाई ए च्यावतीने करण्यात येत आहे.
या मागणीसाठी सुशिक्षित वर्गासह सर्व जनतेने रस्त्यावर यावे. या मोहिमेसाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवावा. व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर, सोशल मीडिया, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमाचा वापर करून सरकारकडे निवेदने सादर करावीत, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जनतेला करत आहोत. लवकरच याबाबत रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ‘नो कोरोना, नो लॉक डाऊन’ याबाबत रिपाई ए च्यावतीने मतदान केंद्रनिहाय सरसकट लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |