01:14pm | Jun 28, 2021 |
फलटण : फलटण पालिकेच्या राजधानी टॉवर मधील अतिक्रमण विरोधातील लढाई संपली नसून या प्रकरणात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रतिपादन फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केले.
याबाबत माहिती अशी, फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून राजधानी टॉवर्स ही इमारत बांधली गेलेली आहे. या इमारतीमध्ये काही व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी नियमबाह्य बदल केल्याचे आरोप फलटण नगरपरिषदेमधील विरोधकांनी सत्ताधार्यांवर केलेले होते. त्या अनुषंगाने सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देवून उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आलेला होता. त्यानुसार सातारचे सहाय्यक नगररचनाकार यांनी राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या पुढील कामास स्थगिती दिलेली होती. परंतू यानंतर सत्ताधारी गटाने थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला व राजधानी टॉवरमध्ये नियमानुसारच नगरपरिषदेने बांधकाम केले असल्याबाबतची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना यासंबंधी आदेश दिले व फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवर्समधील त्या बांधकामाच्या स्थगिती आदेशालाच स्थगिती दिली. यानंतर अशोकराव जाधव यांनी आपली पुढील भूमिका प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केली.
पालिकेकडून करण्यात आलेले बेकायदेशीर काम वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न श्रीमंत सभापतींकडून सुरु साहे. एकीकडे शहरातील जनतेची अतिक्रमणे अमानुषपणे काढून त्यांना रस्त्यावर आणायचे आणि दुसरीकडे पालिकेचे बेकायदेशीर बांधकाम वाचवण्यासाठी नगरविकास मंत्रालयाचा स्थगिती आदेश जर ते आणत असतील तर हा फलटण शहरातील जनतेवर एकप्रकारे अन्यायच आहे. त्यामुळे या प्रकरणात ’दूध का दूध और पानी का पानी’ करण्यासाठी आपण पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी, नगररचना सातारा व नगरविकास खाते या सर्वांविरोधात न्यायालयात दाद मागून या सगळ्यांना पाठीशी घालणार्या नगरसेवकांना घरी बसवणार असल्याचा, इशाराही अशोकराव जाधव यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |