02:31pm | Jul 10, 2020 |
नवी दिल्ली: कुख्यात गुंड विकास दुबे याची पोलिसांकडून हत्या केली जावू शकते. अशा शक्यतेची याचिका सवोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु सुनीवणीपूर्वीच ही शक्यता सत्यात उतरली. कुख्यात गुंड विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने चकमकीत ठार केलं आहे.
याबाबत याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात विकास दुबेला सुरक्षा दिली जावी अशी मागणीही केली होती. पण ही याचिका सुनाणीसाठी येण्याआधीच विकास दुबे ठार झाला आहे. लाइव लॉने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
याचिकेत सांगण्यात आलं होतं की, विकास दुबेच्या साथीदारांची खोट्या चकमकीत हत्या करण्यात आली आहे. घनश्याम उपाध्याय या वकिलाने ही याचिका केली होती. याचिकाकर्त्या वकिलाने गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशात झालेल्या चकमकींची माहितीही याचिकेत दिली आहे. वकिलाने विकास दुबेचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं अशी मागणीही केली होती.
याचिकेत सांगण्यात आलं आहे की, विकास दुबेला सुरक्षा पुरवली जावी आणि चकमकीत त्याला ठार करणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजना करत काळजी घेण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारला द्यावेत. न्यायालयात दिलेल्या तारखेला त्याला हजर करण्यासाठीही सुरक्षा पुरवली जावी. याचिकाकर्त्या वकिलाने विकास दुबेचं घर पाडल्याबद्दल तसंच साथीदारांची हत्या केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली होती.
दरम्यान,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |