04:47pm | Sep 25, 2021 |
सातारा : आम्ही आपणाकडे विविध माध्यमातुन, मागणी केलेल्या कामांपैकी आज सातारा जिल्हयातील कामांचे लोकार्पण होत आहे याचे निश्चितच समाधान आहे. सातारा जिल्हयातील आणि शहरातील विविध विकास कामांना आपण निस्वार्थी आणि निर्व्याज भावनेने आज पर्यंत भरभरुन दिलेले आहे. त्याबद्दल आपले व्यक्तीशः आणि जिल्हावासियांच्या वतीने आभार व्यक्त करत आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय भुपृृष्ठ वाहतुक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री ना.नितिन गडकरी यांना निवदेन देत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर किल्ले अजिंक्यतारा ते किल्ल्याचा पायथा, सज्जनगड ते परळी पायथा आणि महाबळेश्वर ते प्रतापगड रोप वे चे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत, त्यास भरीव निधीची तरतुद करावी अशी आग्रही मागणी देखिल यावेळी केली आहे
याबाबत ना.नितिन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, सातारा जिल्हयाच्या विकासाकरीता, राष्ट्रीय महामार्ग,,केंद्रीय रस्ता निधी, पंतप्रधान सडक योजना इ.योजनांमधुन, जिल्हयातील आणि सातारा शहरातील विविध रस्त्यांची दर्जोन्नती करणे, रुदीकरणासह डोबरीकरण, आदी कामांसह, खंडाळयाच्या नवीन बोगदा, राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठिकाणे नियमित करणे, नवीन सहापदरीकरण, चौपदरीकरणातील तृटी दूर करणे इत्यादी विषयी आम्ही केलेल्या मागण्यांना आपण सर्वोच्य प्राधान्य देत आपण सातत्याने विकास कामे मंजूर केली आहेत. त्यापैकी सातारा जिल्हयातील काही कामांचा आज लोकार्पण सोहळा होत आहे याचे समाधान वाटते असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की,
सातारा जिल्हयाच्या पर्यटन आणि आध्यात्मिक विकासाकरीता किल्ले अजिंक्यतारा ते किल्याचा पायथा, सज्जनगड ते परळी पायथा आणि महाबळेश्वर ते प्रतापगड, या ठिकाणी रोप वे उभारण्याचे आम्ही प्रस्तावित केले आहे. याठिकाणी रोप वे निर्माण करुन पर्यटन आणि आध्यात्मिक दृष्टीकोनामधुन आर्थिक चक्राला अधिक गती देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव आपणाकडे सादर करण्यात येत आहे, त्यास आपण मंजूरी आणि आवश्यक तो भरीव निधी दयावा अशी मागणी देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना.गडकरी यांना केली आहे.
दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निवेदन कराडला ना.नितिन गडकरी यांना दिल्यावर, रोप वे ची संकल्पना खरोखरच चांगली आणि उपयुक्त आहे. याचा लाभ अनेकांना होण्याबरोबच शाररिक श्रम वाचुन नवीन सुविधा निर्माण होणार असल्याने, आपण प्रस्ताव दयावा, त्या प्रस्तावांना जरुर त्या मंजु-या विनाविलंब दिल्या जातील आणि त्याला भरघोस निधी देण्यास आम्ही कुठे कमी पडणार नाही अशी ग्वाही देखिल ना. गडकरी यांनी दिली आहे. तसेच सातारा जिल्हयातील दुर्गम भाग त्याचबरोबर नागरी भागातील रस्त्यांसाठी व सातारा शहरातील हद्दवाढीतील राष्ट्रीय महामार्गास जोडणार्या रस्त्यांना निधी सीआरएफ मधुन मिळाणेबाबतची सुध्दा मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |