08:41pm | Mar 21, 2023 |
सातारा : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यास बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकांनी टाळाटाळ केल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) सचिन मोहिते यांनी संबधित व्यवस्थापकाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत कर्ज न दिल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक मागास प्रवर्गाची कर्ज प्रकरणे मंजूर करताना राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी जाचक अटी सांगून लाभार्थ्यांची कोंडी करतात. त्यामुळे लघु उद्योगा संदर्भातील कर्ज मंजूर होत नसल्याच्या तक्रारी शिवसेनेला प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाप्रमुख सचिन मोहिते त्यांच्या सहकार्यांनी पोवई नाक्यावरील बँक ऑफ बडोदा च्या शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली. मोहिते यांनी संबधित व्यवस्थापकाला कर्ज प्रकरण मंजूर न केल्याबद्दल चांगलीच कानउघाडणी केली. व्यवस्थापकाने हिंदीत संवाद सुरू केल्याने मोहिते संतापले. महाराष्ट्रात आहात ना, तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. काय असेल तर मराठी बोला असे सुनावत बँक व्यवस्थापनाला फैलावर घेतले. शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे बँक कर्मचार्यांची बोलतीच बंद झाली. यापुढे जिल्हाधिकार्यांचे नियम डावलून जर कर्ज प्रकरणे मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा थेट इशारा मोहिते यांनी दिला.
यावेळी सचिन मोहिते जिल्हाप्रमुख, सागर रायते तालुकाप्रमुख, शिवराज टोणपे शहर प्रमुख, शिवेन्द्रा ताटे युवासेना शहर प्रमुख रवींद्र भणगे, अक्षय दौंडे, इम्रान बागवान, हरी पवार, मंदार भांडवलकर, आशिष कुलकर्णी, संतोष शिंदे, विशाल जाधव आदीं यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |