पुसेगाव : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्म्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धांमध्ये आरडगांव केंद्रातील जिल्हा परिषद शाळा तांबवे येथील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती आरगांव व गिरवी केंद्रांचे अभ्यासु उपक्रमशील व प्रयोगशील केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना केंद्रप्रमुख अनिल कदम पुढे म्हणाले की, "अंकनाद राज्य स्तरीय स्पर्धेसाठी ईश्वरी महेश शिंदे इ. 1ली व ओम अमोल शिंदे इ. 3री या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कोविड पार्श्वभूमीवर शाळा बंद असतानाही शिक्षकांनी घेतलेल्या शैक्षणिक प्रयत्नांना गौरवास्पद यश मिळाले आहे.
इयता पहिली मधील ईश्वरी महेश शिंदे हि विद्यार्थ्यांनी १ ते १०० अंक अचुकपणे अचुक उच्चारासह म्हणते. तसेच अचुकपणे ओळखते. इयता तिसरी मधील ओम अमोल शिंदे हा विद्यार्थी २ ते ३० पर्यंत पाढे पाठांतर आहेत व अचूक उच्चारासह पाढे अचुकपणे म्हणतो. या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा तांबवे मधील उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षिका स्वाती घोडके, नंदिनी चांगण, मुख्याध्यापक संगिता गोरड यांनी कोविड कालावधीत प्रतिकुल परिस्थिती असताना नियमितपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रुपाली शिंदे व भारती शिंदे, पालकांचे, सरपंच उपसरपंच सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले."
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विकास मंत्रालय आणि मराठी भाषा विकास संस्था यांनी आयोजित केलेल्या अंकनाद पाढे पांठातर स्पर्धेत राज्य स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक यांचें शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, धनंजय चोपडे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी चेन्नया मठपती, गिरवी, आरडगांव केंद्रप्रमुख अनिल कदम, तांबवे सरपंच नीलम गायकवाड, तांबवे उपसरपंच महेंद्र शिंदे, तांबवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष अमोल शिंदे, रविन्द्रनाथ शिंदे, गजानन शिंदे, ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |