10:40am | Mar 06, 2021 |
पुसेगाव : जांब, जाखणगाव व आसपासच्या वाड्यावस्त्यांमधील ग्रामस्थांना मोबाईल रेंज व इंटरनेट सेवेसाठी धावाधाव करावी लागत आहे. गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज व्यवस्थित नाही. कॅाल न लागणे, कॅाल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू न येणे अशा एक ना अनेक समस्येमुळे ग्राहक संताप व्यक्त करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्वप्रकारच्या ऑनलाईल सेवेत प्रचंड व्यत्यय निर्माण होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासह ग्रामपंचायतीच्या शासकीय कामकाजावर परिणाम होतोय. त्यामुळे पैसे देऊन येथील ग्राहकांचा छळ सुरू असून संबधित कंपन्यांनी रेंज व इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जांब (ता.खटाव)चे माजी सरपंच चंद्रकांत शिंदे यांनी केली आहे.
खटावच्या पश्चिमेला डोंगराळ भागात जवळपास सहा ते सात लहान-मोठी गावं वसलेली आहेत. सर्व गावांची मिळून जवळपास सात ते आठ हजारांवर लोकसंख्या आहे. मात्र संपर्काची आधुनिक सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांना रेंज वा नेटवर्कसाठी एखाद्या उंच घराचा, झाडाचा वा दोन किलोमीटर गावाबाहेर जिथं रेंज असेल, अशा ठिकाणचा सहारा घ्यावा लागत आहे. एकीकडे पंतप्रधान डिजिटलायझेशन, ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन योजनांसाठी आवाहन करत असताना या भागात नेटवर्कअभावी डिजिटल योजनेचा बोजवारा उडाला आहे. जांब, बिटलेवाडी सारख्या गावात रेशनिंग वाटप करणाऱ्या विक्रेत्यांना ऑनलाइन थंब इंप्रेशनसाठी गावाबाहेर उंच ठिकाणी वा गावातील उंच इमारतीचा सहारा घ्यावा लागतो. दोन वर्षापूर्वी जिओ कंपनीने या भागाचा सर्व्हे करून टॅावर उभारणीच्या कामाला सुरुवातपण केली होती. त्याप्रमाणे डीपी उभारून टॅावरसाठी खड्डा काढून बांधकामाला सुरवात देखील केली होती. तथापि अचानक मध्येच या कंपनीने काहीही कारण न सांगता काम बंद केले. ते आजअखेर हे काम जैसे थे च्या स्थितीतच आहे. त्यानंतर कोणी फिरकले देखील नाही.
माजी सरपंच शिंदे यांनी सागितले, आजदेखील या भागातील ग्रामस्थ मोबाईलच्या रेंजसाठी मोबाईल घराच्या छतावर, भिंतीवर ठेवत आहेत. पण त्यातही वानरांचा धोका असतोच. सर्वात जास्त तोटा शालेय विद्यार्थ्यांचा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची नेटवर्क अभावी कोंडी झालीय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन शेतात जाऊन बसावे लागते वा उंच इमारतीचा सहारा घ्यावा लागतो. याशिवाय नोकरीनिमित्त पुण्या-मुंबईला असलेले आयटी मध्ये काम करणारे युवक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी येऊन वर्क फ्रॅाम होम करत आहेत. मात्र त्यांनाही गावी येऊन आगीतून उठून फोफाट्यात पडल्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांच्या मोबाईल नेटवर्क व रेंजच्या संदर्भात संबधित कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुका प्रशासनाने दखल घेऊन ग्राहकांची गैरसोय टाळावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |
दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू |