04:06pm | Jan 29, 2022 |
अहमदनगर : राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीसभरतीची प्रक्रिया राबविली जाणार असून, त्यामध्ये 7200 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, राज्यात 87 पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेण्यात आली असून, नगर जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांचा यामध्ये समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गृहमंत्री वळसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली. नगर जिह्यात 500 पदे रिक्त आहेत. त्यास मंजुरी मिळावी. तसेच नगर जिह्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या पोलीस वसाहतींचा निर्णय घेऊन त्यांना घरे द्यावीत. काही पोलीस ठाण्यांच्या इमारतीच्या बांधकामासाठीही त्यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांचे लक्ष वेधले.
गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, 'राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पोलीसभरतीची प्रक्रिया राबविली होती. यामध्ये पाच हजार 700 पदे भरलेली होती. आता दुसऱ्या टप्प्यात सात हजार 200 पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्यभरात 87 पोलीस ठाण्यांच्या इमारतींची नव्याने बांधकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये नगर जिह्यातील राहुरी, नेवासा व पाथर्डी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद होईल. मार्चनंतर नव्याने घरबांधणीची कामे मार्गी लागतील. नगर जिह्यातही पोलिसांचा घरांचा प्रश्न मार्गी लागेल,' असे त्यांनी सांगितले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |