04:31pm | Jun 17, 2021 |
सातारा : नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, तशी शिफारस राज्य सरकारला करून त्याबाबत सुरू असणाऱ्या चळवळीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी मुंबईलगतच्या चार जिल्ह्यातील शिष्टमंडळाने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आलेला आहे, असे असताना अचानकपणे सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सिडकोच्या या कृतीचा आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता जाहीर निषेध करीत आहोत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दि बा. पाटील यांचे नाव देण्याची आपण राज्य सरकारला शिफारस करावी, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल येथील जनतेच्या मनात नितांत आदर आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही उत्तुंग आहे. त्यांचे नाव महाराष्ट्रातील इतर मोठ्या प्रकल्प ना देता येईल. तसेच मुंबईत त्यांचे शिवाजी पार्क येथे करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभे राहत आहे, त्याचे भूमिपूजन अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
नवी मुंबई ही लोकनेते दि. बा. पाटील यांची कर्मभूमी आहे. येथील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त कष्टकरी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले आहे. १९८४ साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व सार्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पुढे लागू झाले. त्यामुळे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते झाले. पाच वेळा आमदार, एक वेळ विधान परिषदेचे सदस्य, एक वेळ विरोधी पक्षनेते, दोन वेळा खासदार व एक वेळ पनवेलचे नगराध्यक्ष म्हणून ते थेट जनतेतून निवडून आले. त्यांनी महाराष्ट्र विधानमंडळ व दिल्लीच्या संसदेत शेतकरी, कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने बुलंद केला होता. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी व त्यानंतर ओबीसी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी दि. बा. पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. हे ओबीसी समाज आजही विसरू शकत नाही. अशा या महान नेत्याचे नाव त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे नवी मुंबईत सुरू होत असलेल्या विमानतळाला देणे उचित ठरेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शिष्टमंडळातील सदस्य रुपेश धुमाळ, गणेश पाटील, चेतन डाऊर, सर्वेश तरे, अशोक निकम उपस्थित होते.
या संदर्भात योग्य वेळी बोलणार : खा. उदयनराजे
मुंबईलगतच्या चार जिल्ह्यातील शिष्टमंडळाने आज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिफ्ट मंडळाची मागणी ऐकून घेतल्यानंतर या संदर्भात योग्य वेळी बोलणार असल्याचे आश्वासन खा. उदयनराजे यांनी त्यांना दिले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |