11:13pm | Aug 07, 2020 |
सातारा : जिल्ह्यात आज 200 नवीन कोरोनाबाधित निष्पन्न झाले असून 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 67 नागरिकांना कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिनाअखेरीस असणारी आकडेवारी आणि त्यानंतर सव्वा महिन्यात दिसणारी रोजची कोरोनाबाधितांची आकडेवारी निश्चितच फार काही सांगणारी आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास कोरोनावर नक्की मात करता येईल. मात्र जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. आज जिल्ह्यात नवीन 200 कोरोनाबाधित निष्पन्न झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5379 वर पोहोचली आहे. तसेच आज 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 162 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आज 67 नागरिकानंा कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. या कोरोनामुक्तांमध्ये कराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष., मलकापुर येथील 33, 52, 33, 28, 33, 25 वर्षीय पुरुष व 1 महिला., हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष., आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष व 30, 36 वर्षीय महिला., कृष्णा मेडीकल कॉलेजमधील 26 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 32 वर्षीय महिला., कोयना वसाहत येथील 20 वर्षीय युवक., पाटण तालुक्यातील निगडे येथील 60 वर्षीय महिला., चाफळ येथील 6 वर्षीय बालक., जाधववाडी येथील 2 वर्षीय बालिका व 25 वर्षीय महिला., नेरले येथील 2 महिला व 63 वर्षीय पुरुष., म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालिका., अंब्रग येथील 58, 27, 29 वर्षीय पुरुष व 50, 25 वर्षीय महिला., मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला., तारळे येथील 4 वर्षीय बालक., वाई तालुक्यातील वाई शहरातील 46 वर्षीय पुरुष व 16, 11 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला., कोरोना केअर सेंटर वाई येथील 34, 48 वर्षीय पुरुष., शाहबाग येथील 32, 35, 53 वर्षीय पुरुष., शांतीनगर येथील 45, 15, 42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष., जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील सातारा शहरातील सेनगिरी कॉलनी सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष., मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष., लिंब येथील 54 वर्षीय महिला व 5, 2, 9 वर्षीय बालिका व 9, 5 वर्षीय बालक., वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष., कण्हेर येथील 65 वर्षीय महिला., लक्ष्मी टेकडी येथील 31, 24, 40, 60 वर्षीय महिला व 24, 35 वर्षीय पुरुष., खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष., पाडेगाव येथील 84, 14, 42 वर्षीय पुरुष., कोरेगाव तालुक्यातील वाठारकिरोली येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
464 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, कोरेगांव 12, वाई येथील 29, शिरवळ-खंडाळा येथील 76, रायगाव येथील 21, पानमळेवाडी येथील 107, मायणी येथील 39, महाबळेश्वर येथील 11, पाटण येथील 43, दहिवडी येथील 12, खावली येथील 3, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 62 असे एकूण 464 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
4 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू
क्रांतीतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे गडकर आळी, सातारा येथील 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गंगापुरी, वाई येथील 57 वर्षीय पुरुष, परखंदी ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष तसेच कराड येथील खाजगी रुग्णालयात अतित ता. सातारा येथील 29 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |