सातारा जिल्हा हा अत्यंत शांत, नितळ आणि वैचारिक विचार जोपासणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणून साताऱ्याची ओळख आहे, या अभिमानाने आमचा ऊर भरून येतो. याच पावनभूमीला थोर साधुसंत, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेते लाभले. याच जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे क्रांतिवीर लाभले. याचा आम्हाला सार्थ वाटतो. या जिल्ह्याने देशाला अनेक थोर विचारवंत दिले. मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली, त्या महात्मा सावित्रीबाई फुले यांची जयंती आमच्या जिल्ह्यात अभिमानाने साजरी होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही आम्हाला कधीच विसर पडत नाही याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचा जिल्हा वैचारिक आहेच, मात्र तुमच्यासारख्या प्रामाणिक वनविभागाच्या वर्ग- १ अधिकाऱ्यांपासुन वन रक्षकापर्यंत जिल्ह्याची नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यासह अनेक कीटक, पशु आणि जंगली श्वापदांचे रक्षण प्रामाणिकपणे केले जाते, हे आम्ही कदापि विसरू शकत नाही. वन विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी हा आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतो. याचा अनुभव आम्ही याच देही, याच डोळा घेतला आहे.
निसर्गामध्ये जशा चांगल्या प्रवृत्ती आहेत, तशाच अपप्रवृत्ती आहेत. पळसावडे, ता. सातारा येथे घडलेली गर्भवती महिलेला मारहाणीची घटना अत्यंत लांच्छनास्पद, अपप्रवृत्तीचे प्रतीक अशीच आहे. या घटनेचा निषेध कोणत्या शब्दात व्यक्त व्यक्त करावा, त्याला शब्दही पुरेसे पडणार नाहीत. भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता, बहिण, पत्नी, मुलगी अशी ती अनेक रूपात आपल्याला पाहायला मिळते. तिला दुर्गेसमान मानले जाते, हे कदापि विसरून चालणार नाही. अशा आपल्या भगिनीसमान ३ महिन्याची गरोदर असलेल्या एका वनरक्षक महिलेला एक मस्तीखोर माजी सरपंच आणि त्याच्या समवेत असणाऱ्या महिलेने बेदम मारहाण करणे ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. यापूर्वीही या मस्तीखोर माजी सरपंचाने सातारा शहरातील एका विशिष्ट वाड्याचे नाव घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह सातारा पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ताकद देणाऱ्या लोकशाहीतील लोकप्रतिनिधींनी आजच्या घटनेच्या निमित्ताने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. साहेब, 'त्याला' सोडू नका, त्याच्यावर गुन्हा दाखल करून वन विभागाच्या कायद्यानुसार त्याच्यावर जलदगती न्यायालयात गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न करून केवळ वन विभागातील महिलांनाच नव्हे तर समस्त महिला समाजाला न्याय द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
- एक सातारकर नागरिक.
कुठे आहेत महिला संघटना ?
देशातील कोणत्याही राज्यात अथवा महाराष्ट्रातील जिल्ह्यात एखाद्या युवतीवर अथवा महिलेवर अन्याय झाल्यास अथवा त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्यास सातारा येथे मेणबत्ती पेटवून तिला अभिवादन करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते. पळसावडे येथील घटनेत तीन महिन्याच्या गर्भवती महिला रक्षकास एक माजोर माजी उपसरपंच एका महिलेच्या साह्याने बेदम मारहाण करतो. त्या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊन तब्बल पाच तास होऊन गेले तरी त्या घटनेबाबत एकही महिला आवाज उठवत नाही, याबद्दल आश्चर्य वाटते. माहिती अधिकाराचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्या, आपल्या जातीचा सोयीस्करपणे अर्थ लावणाऱ्या. कोणाच्यातरी वाड्यावर हुजरेगिरी करून कोणत्याही मार्गाने सगळच आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या मस्तीखोर माजी सरपंचाच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील महिला गप्प का आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहिला शिवाय राहत नाही. लोकप्रतिनिधी, पद ही कोणाची जहागिरी नाही, ती पाच वर्षाची बिदागी असते हे ओळखून पळसावडे येथील महिलेला न्याय देण्यासाठी किमान गुरुवारी तरी महिला पुढे येतील, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |