05:00pm | Feb 04, 2021 |
कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया सरकार आणि गुगलच्या वादात आता मायक्रोसॉफ्टने ऑस्ट्रेलिया सरकारच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे. गुगलला बातम्यांसाठी शुल्क आकारण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाला मायक्रोसॉफ्टने पाठिंबा दर्शववत बिंग या सर्च इंजिनसाठी जाहिराती घेताना शुल्क न आकारण्याची ग्वाहीही दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने बातम्यांसाठी गुगलकडून शुल्क आकारण्याबाबत कायदा करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, गुगलच्या अधिकार्यांनी सिनेटसोबतच्या सुनावणीत ऑस्ट्रेलियात गुगलची सेवा थांबवण्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर मायक्रोसॉफ्टला आपले सर्च इंजिन बिंगसाठी बाजारपेठ विस्तारण्याची संधी मिळाली आहे.
‘ऑस्ट्रेलिया सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टेक्नॉलॉजी’ या त्रयस्थ संस्थेने मायक्रोसॉफ्टच्या भूमिकेचे स्वागत केले असून गुगलच्या सेवा थांबवण्याच्या धमकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गुगल आणि फेसबुकचा ऑस्ट्रेलियातील वरचष्मा हा ते ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांप्रती आदर दाखवतील तोपर्यंतच शक्य आहे, असेही या संस्थेचे संचालक पीटर ल्युईस यांनी सुनावले आहे.
बिंग हे ऑस्ट्रेलियातील दुसर्या क्रमांकाचे सर्च इंजिन असले, तरी त्यांचा मार्केटमध्ये केवळ 3.6 टक्के वाटा आहेत, असे वेब विश्लेषण करणारी सेवा स्टॅटा काऊंटरचे म्हणणे आहे. आपला 95 टक्के वाटा असल्याचे गुगलचे म्हणणे आहे. स्विनबर्न विद्यापीठाच्या माध्यम क्षेत्रातील वरिष्ठ प्राध्यापक बेलिंडा बार्नेट यांच्यामते ऑस्ट्रेलीयात बिंग गुगलची जागा घेण्यास सक्षम आहे.
गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि दळणवळण मंत्री पॉल फ्लेचर यांच्यासोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत मायक्रोसॉफ्टने ‘न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड’ला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केल्याचे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बॅड स्मिथ यांनी सांगितले. मॉरिसन यांनीही नडेला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ऑस्ट्रेलियात गुगलची जागा बिंग घेणार असल्याबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |