09:28pm | May 18, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात आज नवीन ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३८ वर पोहोचला आहे. कोरोनाबाधित निष्पन्न झालेल्या रूग्णांमधील एकजण सोलापूर जिल्ह्यातील आहे. सकाळी या धक्क्याने धास्तावलेल्या जिल्हावासियांना सायंकाळी मात्र ७ जणांच्या कोरोनामुक्तीच्या बातमीने सुखद धक्का दिला. मात्र याचदरम्यान पाटण तालुक्यातील बनपुरी येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या एका महिलेचा आज मृत्यू झाल्याने ढेबेवाडी, तळमावलेतील नागरिकांनी कोरोनाच्या दहशतीने कडकडीत 'लॉकडाऊन' पाळला. या महिलेवर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असणारा ठाणे येथून प्रवास करुन आलेले २६ वर्षीय, ६७ वर्षीय पुरुष व मुळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेली एक ३२ वर्षीय महिला तसेच कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड बाधित रुग्णाचा निकट सहवासित म्हणून दाखल असणारे ५३ व २२ वर्षीय नागरिक अशा एकूण ५ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आजच्या बाधितांमध्ये कराड तालुक्यातील उंब्रज येथील कोरोनाबाधिताच्या निकट सहवासात आलेले दोघेजण असल्यामुळे उंब्रजकर हादरले आहेत. तथापि, हे दोघेजण कराड येथे संस्थात्मक विलगीकरणात होते, त्यामुळे लोकांनी घाबरून जावू नये, पण काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आज सातारा येथील तीन व कराड येथील चार रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्यामुळे त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज दिला गेला. यामध्ये कराड तालुक्यातील मलकापूर येथील दोन वर्षाची बालिका, एक पुरूष (वय ३७), आगाशिवनगर व खोडशी येथील पुरूष (दोघांचेही वय ६८), सातारा कारागृहातील दोन कैदी (४५ वर्षाची महिला व १८ वर्षीय युवक), सोनके (ता. कोरेगाव) येथील एक पुरूष (वय ४०) यांचा समावेश आहे. त्यांचे चौदा दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १३८ झाली असून यापैकी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० इतकी झाली आहे. मृत्यु झालेले २ रुग्ण आहेत. आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या २३२ जणांचे आणि बनपुरी येथे मरण पावलेल्या महिलेचाही कोविड संशयित म्हणून नमुना तपासणीकरिता पुणे येथे पाठविण्यात आला आहे. आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे २०, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे १०५, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे ६७, फलटण
उपजिल्हा रुग्णालय येथे ११, कोरेगाव ग्रामीण रुणालय येथे १७ व वाई ग्रामीण रुणालय येथे १२ अशा एकूण २३२ जणांच्या घशातील स्त्रावांचे एनसीसीएस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना संशयित महिलेचा मृत्यू
पाटण तालुक्यातील सळवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या बनपुरी विलगीकरण केंद्रात दाखल असलेल्या ४३ वर्षीय महिलेचा काल रात्री अचानकपणे मृत्यू झाला. ही महिला १५ मे रोजी दहिसर पूर्व, मुंबई येथून खाजगी मिनिबसने सहकुटुंब (आठ व्यक्ती) निघून १६ मे रोजी सकाळी ६ वाजता गावाकडे आली होती. त्यानंतर त्यांना बनपुरी येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. काल रात्री पावणे आठच्या सुमारास अचानक तब्बेत बिघडल्यामुळे ढेबेवाडीला नेण्यात आले. तेथून तिला कराडला नेण्यास सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले जात असले तरी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज सकाळी या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर मृत्युचे निश्चित कारण स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील रेस्टॉरंटना पार्सल सेवा सुरु करण्यास परवानगी
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने दि. 31 मे 2020 पर्यत चौथा लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य, पोलिस, सरकारी अधिकारी, आरोग्यसेवा कर्मचारी, लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेले नागरिक, पर्यटक आणि अलगीकरण कक्षातील व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच बस डेपो, रेल्वेस्थानक व विमानतळावरील कॅन्टीन वगळून जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट मधील किचनमध्ये मागणीनुसार ताजे खाद्यपदार्थ तयार करुन ते सकाळी 8 ते सांय 6 या निर्धारीत वेळेत ग्राहकांच्या मागणीनुसार कंटेन्मेंट झोन वगळून फक्त होम डिलीव्हरी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी दिली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |