सातारा : कोरोना संसर्गामुळे राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने ज्यांची वयोमर्यादा संपली आहे त्यांना आजही फटका बसत आहे. मध्यप्रदेश सरकारने मात्र विद्यार्थ्यांचे हित जोपासत 3 वर्षांची मुदत वाढ दिली असताना महाराष्ट्र सरकारने मात्र 2 वर्षांचीच मुदत वाढ दिली आहे. यामुळे मध्यप्रदेशला जमे तेथे महाराष्ट्र सरकार कमी पडे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये होवू लागली आहे.
महाराष्ट्र सरकारने अशा विद्यार्थ्यांना केवळ एक वर्षाची मुदतवाढ दिली. या कालावधीत केवळ राज्यसेवेची एकच जाहीरात प्रसिध्द झाली आहे. याचा फारसा फायदा विद्यार्थ्यांना झालेलाच नाही. आता मात्र एमपीएससीच्या मोठ्या प्रमाणात जाहीरात निघू लागल्या आहेत. या संधीचा फायदा सर्वांना व्हावा, या उद्देशाने ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे त्यांना वाढीव दोन वर्षांची मुदत मिळावी, अशी मागणी वाढू लागली आहे.
कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे परीक्षेला बंदीच होती. पुढे जनजीवन सुरळीत झाल्यानंतर परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. मात्र ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली त्यांचे काय करायचे? याबाबत कोणीच काही बोलत नव्हते. अखेर असे उमेदवारच रस्त्यावर उतरले. आंदोलने करत आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या. याची दखल घेवून सरकारने एक वर्षाची मुदत वाढ करत असल्याचे जाहीर केले. मात्र जाहीरत एकच सोडून तोकड्याच जागा सोडल्या. ही एक प्रकारे अन्यायाची भावना असून वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. पुढील आठवड्यात सरळसेवेची परीक्षा होत असून त्यासाठी मध्यप्रदेश, ओडीसा, राजस्थान, आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी एमपीएससी करणार्या विद्यार्थ्यांमध्ये होवू लागली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |