10:49pm | May 28, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8 रूग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्याचवेळी सातारा तालुक्यातील 2, कराड व पाटण तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 4 नवे कोरोना रूग्ण वाढले. त्यामुळे जिल्ह्यात धास्ती आणि दिलासा यांचा ऊनसावलीचा जीवघेणा खेळ सुरू असल्याचा अनुभव सर्वजण घेत आहेत. बुधवारी उच्चांकी 80 कोरोनाबाधित निष्पन्न झाल्यामुळे आणि पाच बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे हादरून गेलेल्या जिल्हावासीयांना आजच्या कोरोनामुक्तीच्या वृत्ताने त्यातल्या त्यात दिलासा मिळाला.
कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणारे म्हासोली येथील 8 कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या आठ रुग्णांच्या 14 व 15 दिवसानंतर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये हे बाधित रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या आठ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या आता 134 झाली आहे.
आज कराडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल असणारा विंग (ता. कराड) येथील 50 वर्षीय पुरूष व तामिणे (ता. पाटण) येथील 7 वर्षीय बालिका तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्पैत तपासणी करण्यात आलेल्या परळी (ता. सातारा) येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्ट बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 426 झाली असून त्यापैकी 134 जण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये 277 रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा 15 पर्यंत गेला असल्याने जनतेतील भीती व चिंता कायम आहे.
पनवेल येथून प्रवास करुन आलेल्या मलकापूर (ता. कराड) येथील स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असणार्या (मूळ गाव बाचोली, ता. पाटण) 47 वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने 21 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती हा कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. या बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, दि. 26 मे रोजी जिल्हा रुग्णालय येथे मृत्यू झालेल्या 54 वर्षीय पुरुषाचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह आला असून एनसीसीएस, पुणे यांनी 191, तर कृष्णा मेडिकल कॉलेज यांनी 39 अशा एकूण 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे म्हटले आहे. सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 27 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
कोरोना चाचणी सातार्यात होणार
आजपासून सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे ट्रुनॅट मशिनद्वारे कोविड-19 ची चाचणी करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |