01:09pm | Jul 01, 2022 |
सातारा : बारामती तालुक्यातून दुचाकी चोरुन आणून त्या साताऱ्यात फिरवत असलेल्या दोन दुचाकी चोरट्यांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे. किशोर हणमंत माने (वय 20, रा. तडवळे, ता. कोरेगाव, सध्या रा. सातारारोड, ता. कोरेगाव) व शिवराज संतोष फाळके (वय 19, रा. पॉवर हाऊस, सातारारोड, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या दुचाकीचोर युवकांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीतील 2 लाख 30 हजार रुपये किंमतीची बुलेट व बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हयाचे अनुशंगाने सातारा शहर डी.बी.
पथकातील पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना बातमीदारामार्फत मोटारसायकल चोरीतील संशयित युवकांची माहिती प्राप्त झाली. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांना पकडणेबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या. डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ सातारा शहरामध्ये पेद्रालिंग करत असताना अजंठा चौक परिसरामध्ये दोन युवक विना नंबर प्लेट बजाज पल्सर मोटारसायकलवरून संशयास्पद फिरताना दिसून आले. त्यास डी.बी. पथकाने सदरची मोटारसायकल पाठीमागून पकडली असता त्यांनी सदरची मोटारसायकल जबरदस्तीने चालवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डी.बी. पथकातील स्टाफने यांना जागीच पकडले.
त्यांच्याकडे सदर मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांना कोणतेही समाधानकारण उत्तरे देता आली नाहीत. म्हणून सदर युवकांना ताब्यात घेवून त्यांना अटक करून त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल ही चोरीची असून ती त्यांना त्यांच्या अन्य एका साथीदाराने दिल्याचे सांगितले. सदर मोटारसायकल ही बारामती तालुक्यातून चोरी झालेली समजून आले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडून आणखी एक बुलेट मोटारसायकल चोरी केली असल्याचे समजले. सदरची बुलेट व मोटारसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे. याबाबत बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक ऑँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |