पुसेगाव: विसापूर (ता.खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (ता.13) वासराचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गाईला काही दिवसांपूर्वी खोंड झाला. ज्याप्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याचप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्यांनी या वासराचे बारसे गावातील श्री वाघेश्वरी व नवलाई देवी मंदिरच्या आवारात मंडप घालून, पाळणा सजवून, पाळणे गाऊन उत्साहात साजरे केले.
जगन्नाथ साळुंखे यांना खिल्लार जातीच्या पशुधनाचे संगोपन करण्याचा छंद आहे. साळुंखे यांच्या सोनी या गाईने काही दिवसांपूर्वी एका वासराला जन्म दिला होता. त्याचवेळी आपल्याला दुध देऊन आपले पोषण करणार्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून वासराचे नामकरण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सोनी या गाईला व तीच्या वासराला आंघोळ घालून सजवून तिची विधिवत पूजा करून या नामकरण सोहळ्यासाठी तयार केले. यावेळी वासराला छान सजविलेल्या पाळण्याजवळ ठेवून सोन्या असे नामकरण करण्यात आले. आणि त्यानंतर परंपरेनुसार सर्व महिलांना पेढे व बारशाच्या घुगर्या देऊन पाळणे म्हणण्यात आले. अन्नदान करणेत आले. त्यामुळे विसापुरात या वासराच्या बारशाच्या समारंभाची लगबग पाहायला मिळाली. दरम्यान, आपल्या मुलांप्रमाणे जनावरांनादेखील जीव लावणारे शेतकरी कुटुंब यानिमित्ताने पाहायला मिळाल्याची भावना पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली.
पूर्वी बैलगाडी शर्यत व शेतीसाठी खिल्लार बैलांची मागणी मोठी असायची. हे बैल सांभाळण्याचा खर्च जास्त असतो. आता शेतीचे यांत्रिकीकरण झाले असून बैलगाडा शर्यती देखील बंद झाल्याने या बैलांचा वापरच राहिला नाही. त्यामुळे खिल्लार जातच नामशेष होईल की काय? अशी भीती आहे. खिल्लार वंशाची जपणूक होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकर्यांनी खिल्लार गाईंचे महत्त्व जाऊन गोपालन करण्याची गरज असल्याचे साळुंखे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी हरिभाऊ सावंत, नवनाथ साळुंखे, बाळासाहेब सावंत, उमेश सावंत, भीमराव जगताप, मुरलीधर साळुंखे, गुलाबराव साळुंखे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे विसापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |