03:44pm | Dec 03, 2020 |
कराड : कृष्णा हॉस्पिटलमध्ये एका 25 वर्षीय युवतीच्या हृदयातील अंतरपडद्यावर असणारे मोठे छिद्र एएसडी क्लोजर डिव्हाईस या आधुनिक तंत्राने बंद करण्याची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे पार पडली. केवळ पुण्या-मुंबईतच अशाप्रकारची होणारी ही शस्त्रक्रिया कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी करणारे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांचे व कृष्णा हॉस्पिटलचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या शस्त्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देताना हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी सांगितले, मानवी हृदय हे त्यामध्ये असणार्या उभ्या-आडव्या अंतरपडद्यामुळे चार कप्प्यात विभागलेले असते. यापैकी डाव्या बाजूच्या कप्यामधून शुद्ध रक्त वाहत असते, जे शरीराच्या सर्व भागात पुरविले जाते. तर उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये अशुद्ध रक्त वाहत असते, जे शुद्धीकरणासाठी फुफ्फुसांना पोहोचविले जाते. परंतु काही व्यक्तींच्या हृदयातील अंतरपडद्यांना जन्मजात छिद्र असते. त्यामुळे शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकांत मिसळून जाते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये शरीराला भेसळयुक्त शुद्ध-अशुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो. वैद्यकीय भाषेत या छिद्रांना एएसडी, व्हीएसडी आणि पीडीए अशी नावे आहेत. अशा व्यक्तींना दम लागणे, वारंवार जंतुसंसर्ग होणे, मेंदुची व शरीराची वाढ कमी होणे आदी समस्या उद्भवतात. वेळीच उपचार न केल्यास अशा व्यक्तींच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. अशा जन्मजात दोष असणार्या व्यक्तींवर पूर्वी गुंतागुंतीची, किचकट व खर्चिक असणारी हृदयशस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी ही एकमेव उपचार पद्धती केली जात असे. परंतु आता मात्र प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्लोजर डिव्हाईस ही नवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती विकसित झाली आहे. या पद्धतीमध्ये ओपन हार्ट सर्जरी टाळून ज्याप्रमाणे ऍन्जिओग्राफी अथवा ऍन्जिओप्लास्टी केली जाते, त्याच धर्तीवर शरीरावर कोणताही मोठा छेद न करता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही मिनिटांतच एक विशिष्ट प्रकारची कृत्रिम छत्री अथवा चकती वापरून हृदयाच्या अंतरपडद्यावरील छिद्र बंद केले जाते. डिव्हाईस क्लोजर ही पद्धती 21 व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाने वैद्यकशास्त्राला दिलेली एक अमूल्य अशी देणगी म्हटली पाहिजे.
शिरवळ येथील अशाच एका 25 वर्षीय युवतीच्या हृदयातील अंतरपडद्यामध्ये 36 मिमी एवढ्या मोठ्या आकाराचे छिद्र जन्मापासून होते. तिला त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी तिला ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर छातीवर कायम व्रण राहतो. याचा विचार करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय युवतीने व तिच्या पालकांनी लांबणीवर टाकला. अशातच युवतीचा त्रास वाढत गेला. दरम्यान, या युवतीच्या पालकांना मुंबईस्थित एका डॉक्टरांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये एसडी क्लोजर डिव्हाईस शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार या अत्याधुनिक प्रणालीच्या शस्त्रक्रियेत पारंगत असणारे कृष्णा हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून हे आव्हान स्वीकारले. त्यानुसार पेशंटला भूल न देता ही शस्त्रक्रिया अवघ्या 30 मिनिटांच्या कालावधीत यशस्वी केली. दुसर्याच दिवशी पेशंटला डिस्चार्ज मिळाला.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |