नवी दिल्ली : मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. गुलाटी यांच्या निधनामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची भावना समाज माध्यमांवर उमटत आहे.
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.
चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत.
२०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. यापूर्वीही अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वीच गुलाटी यांच्या निधानाचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितलं होतं.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |