06:49pm | May 27, 2023 |
सातारा : यंदाच्या मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार 105 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी दिनांक 20 जून पर्यंत करण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळले की गावात सात लोकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत. या अंतर्गत पाणी गुणवत्तेच्या पोर्टलवर पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळ जोडणी असलेली कुटुंबे इत्यादी स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करून रासायनिक तपासणीसाठी गुणवत्ता पोर्टल यूआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात यावेत, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाने दिल्या आहेत. रासायनिक तपासण्यासाठी पाणी नमुने घेताना मुख्यत्वे नळ पाणीपुरवठा योजनेच्या स्त्रोतांतून व योजना नसल्यास पिण्याच्या पाण्याच्या वापरात असलेल्या स्त्रोतांमधून घ्यायचे आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावातील जलसुरक्षक व आरोग्य सेवक यांनी संयुक्तपणे पाणी नमुने गोळा करणे व हे पाणी नमुने आयडी सह जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत. जिल्ह्यातील जावली तालुक्यात 333, कराड 632, खंडाळा 209, खटाव 542, कोरेगाव 371, महाबळेश्वर 257, माण 326, पाटण 909, फलटण 502, सातारा 687, वाई 337 अशा पाणी स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत पाणी योजनेच्या टाक्यांची स्वच्छता दर तीन महिन्यातून एक वेळ करणे गरजेचे आहे. सध्या ग्रामपंचायत स्वच्छता करावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात स्त्रोत दूषित होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे काटेकर पालन करावे, अशा स्पष्ट सूचना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |