12:32pm | Sep 27, 2022 |
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? असा सवालच छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळ यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.
सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार पडला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना भुजबळ यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही असंही भुजबळ म्हणाले.
देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं भुजबळ म्हणाले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली.
शारदा मातेला छगनजी यांना आक्षेप का ? : आनंद दवे
आनंद दवे यांनी भुजबळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. देवी सरस्वतीवरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत छगनजी भुजबळ यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी दवे यांनी केली आहे. फुले दामपात्यांचे फोटो शाळेत असायलाच हवे, बाबासाहेबांचे पण असावेत. पण सरस्वती माता, शारदा मातेला छगनजी यांना आक्षेप का ? असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे. सरस्वती, शारदा यांना कोणीच पाहिले नाही. उद्या गणपतीचे फोटो पण नाकारणार का? हिंदू दैवतांचाच यांना राग का आहे असा सवालही दवे यांनी उपस्थित केला आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |