09:10pm | Jan 22, 2023 |
सातारा : येथील मराठी विश्वकोश कार्यालयासाठी नव्याने अद्ययावत इमारत उभारणार असल्याचे व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाच्या इमारतीसाठी जागेची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठी विश्वकोशाचे सहसचिव शामकांत देवरे, पुरुषोत्तम जाधव, विकास शिंदे, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे आदी उपस्थित होते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सुरु केलेले येथील विश्वकोश निर्मितीचे कार्य हा मराठी भाषेचा ठेवा आहे. तो जिवंत ठेवण्यासाठी व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक म्हणून विश्वकोशाची नवी इमारत ही अद्ययावत परिपूर्ण असेल. यामध्ये कार्यालय, अभ्यासिका, ग्रंथालय, अँफी थिएटर, अभ्यासिका अशा सुविधा दीड एकर जागेत उपलब्ध केल्या जातील. या इमारतीसाठी एका संस्थेची व एका खाजगी जागेची पाहणी करण्यात आली आहे.
विश्वकोश हा मराठी भाषेचा मानबिंदू आहे. ज्यावेळी येथे विश्वकोशाची अद्ययावत इमारत पूर्ण होईल त्याचवेळी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे स्वप्न पूर्ण होईल. शासन मराठी भाषेचा आणि विश्वकोशाचा प्रचार आणि प्रसार जगभर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नुकतेच मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
केंद्र शासनाकडून नव्याने शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मराठी भाषेचा वापर करण्यात येणार आहे. इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करण्याचे सामर्थ्य फक्त विश्वकोशात आहे. यामुळे पुढील काही महिन्यात हे मार्गी लावण्यात येईल. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अनेक प्रगल्भ शिक्षक असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावा यासाठी शैक्षणिक स्तरावर एक मासिक सुरू करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील शाळांमधून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प राज्यातील शिक्षकांना व शिक्षणाच्या अभ्यासकांना उपलब्ध होतील. राज्यातील शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या समस्या समजून घेत आहोत. जेणेकरून राज्यातील शैक्षणिक धोरणाला चांगला आकार देता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |