शहरापासून गावापर्यंत आणि महालापासून पालापर्यंत कोरोनाने हातपाय पसरलेत. हादरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेत गेली एक वर्षापासून जगभरातला माणूस या अभूतपूर्व संकटाशी सामना करतोय. आतापर्यंत कोट्यवधी लोक कोरोना बाधीत झालेत, तर लाखो लोकांनी प्राण गमावलेत. कधी कोणाचा जीव जाईल, याचा काही अंदाज कोणालाच बांधता येत नाही, इतकी हतबलता आपण सर्वचजण अनुभवतोय.
कोरोना व्हर्सेस माणूस असेच एकप्रकारे घनघोर युध्द सुरु झालंय. यात कोण जिंकेल किंवा कोण जिवंत राहील, हेसुध्दा ठामपणे कोणाला सांगता येईना. परंतु जीवसृष्टीच्या या प्रवासात मानवाने आजपर्यंत केलेल्या संघर्षातून त्यांच्या उत्क्रांतीतून एक हाक मात्र सतत जगाच्या कानावर पडतेय, ती म्हणजे 'तू लढ !'. किंबहुना, त्यमुळेच की काय माणसाची या कोरोनाला हरविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा सुरु आहे. खरंतर माणूस आजवर कोणत्याच संकटापुढे झुकला नाही. उलट त्यांच्याशी दोन हात करतच तो जगत आलाय, उत्क्रांत होत आलाय. लढणं, झगडणं हे त्याच्या सळसळत्या रक्ताचाच गुणधर्म होय. म्हणूनच तो कोणत्याच संकटाशी स्पर्धा करायला मागे हटत नाही. तो रोगाशी स्पर्धा करतो, महारोगाशी स्पर्धा करतो, तो पुराशी स्पर्धा करतो, महापुराशी स्पर्धा करतो, तो नदीशी स्पर्धा करतो, महानदीशी स्पर्धा करतो, तो सागराशी स्पर्धा करतो, तो महासागराशी स्पर्धा करतो, कधी तो दऱ्याखोऱ्यांशी स्पर्धा करतो, तर कधी उंच उंच पर्वतांशी स्पर्धा करतो. कधी तो महाकाय वादळाशी भिडतो, तर कधी आकाशातून खळकन खाली कोसळणाऱ्या वीजेशी सामना करतो. थोडक्यात माणूस हा स्पर्धेला वा संकटाला कधीच घाबरत नाही. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याशी झगडा करण्याची हिंमत, धमक मानवी शरीरात आणि त्याच्या मनात ही असतेच. फक्त ती जनरेट करण्याची भूमिका आपण पार पाडायला हवी. तेवढं जमलं की मग जगणं कधी जिंकून जातं, हे आपल्यालाही कळत नाही.
सध्या ज्याच्याशी मानवाचा झगडा सुरुंय, तो कोरोना हा शत्रू अदृश्य आहे. त्यामुळे त्याच्याशी लढताना आपली, जगाची दमछाक होतेय. परंतु असे असले तरी न थांबता, न थकता आपण झगडा करतोच आहोत, लढतोच आहोत. वास्तविक या लढाईत लाखो लोकांना प्राण गमवावे लागताहेत. आपल्या कुटुंबातील, नातेवाईकांमधील रक्ताची माणसं गमवावी लागताहेत. काय करावे आणि कसे जगावे, अशी केविलवाणी परिस्थिती घरात अंगाणात सतत थैमान घालताना दिसतेय. तथापि याही परिस्थितीतून माणसाला बाहेर काढण्यासाठी कोट्यवधी हात आज विनातक्रार झटताहेत. मग त्यामध्ये डॉक्टरांचे, परिचारिकांचे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि पोलीस यंत्रणेचेसुध्दा हात आहेत. खरंतर, जे लोक सेवाभावी वृत्तीने प्राणपणाने झटताहेत आणि कोरोनापासून मनुष्याला वाचवताहेत त्यांना अंत:करणपूर्वक सॕल्यूट करायलाच हवा ! मात्र जे या अवघडलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन रेमडिसिव्हरचा काळाबाजार करताहेत, रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी पैसे घेताहेत, लस उपलब्ध करून देण्यासाठी पाकीट मागताहेत, पेशंट निगेटिव्ह असतानाही तो पॉझिटिव्ह आहे असं सांगून त्याला hospital मध्ये ॲडमिट करून स्वतःच्या तुंबड्या भराताहेत. आमदार, खासदार, मंत्री यांची नावे सांगून अन् त्यांची पत्रं दाखवून दलाल अमाप पैसे कमावताहेत, या साऱ्यांना काय करावे ?
अर्थात वेळ ही अशी गोष्ट आहे कि, योग्य वेळ आल्यावर ज्याचा-त्याचा सोक्षमोक्ष आपोआप लागतोच. त्यामुळे कोरोनाचा गैरफायदा उठवणाऱ्यांनी वेळीच स्वतःमधला माणूस जागा करावा आणि त्या जाग्या झालेल्या माणसाला ठणकावून सांगावे 'अरे ही वेळ पैसे कमविण्याची नाही, तर माणुसकी कमविण्याची आहे. मानवतावादी भूमिका घेऊन माणसाने माणसाशी माणसासम वागण्याची आहे. ही वेळ परस्परांना आश्वासक दिलासा देण्याची आहे. त्यामुळे ही वेळ जपुयात, सर्वांचं जगणं वाचवुयात आणि म्हणुयात भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत !'
अरुण जावळे.
९८२२४१५४७२
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |