07:00pm | May 22, 2021 |
वाई : सद्यस्थितीत वाई शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. शहारत टाळेबंदी आहे. शहरात तशी स्मशान शांतता आहे. पालिका प्रशासन मात्र वाईकरांसाठी आम्हीं किती तत्पर आहोत यांचा दिखावा करत वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सर्व प्रभागात तीन दिवस फॉगिंग करण्यात आले. बिल मात्र एक-दोन नव्हें तर तब्बल पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा तर मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. यासंदर्भात उपनगराध्यक्ष, व अन्य नगरसेवकांनी तक्रार केली आहे.
वाईकरांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी कोरोना सोबतच अन्य साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी पालिका प्रशासन व नगराध्यक्षा यांनी संयुक्तरित्या एक धोरणात्मक निर्णय म्हणून शहरातील सर्व प्रभागात औषध फवारणीचा निर्णय घेत त्यांची तात्काळ अंमलबजावणीही केली. यासाठी एका ठेकेदारांच्या माध्यमातून तीन फॉगिंग मशीनच्या सहाय्याने तीन दिवस असे पस्तीस दिवस औषध फवारणी करण्यात आली. आणि फवारणी पोटी त्या ठेकेदारांच्या नावाने तब्बल पाच लाख रुपयांचे तात्काळ बिल ही काढण्यात आले. हा सर्व प्रकार उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची शहनिशा आरोग्य विभागाकडे केल्यानंतर पस्तीस दिवसांचे पाच लाख रुपये बिल काढले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कोरोनाच्या नांवावर मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची कल्पना तीर्थक्षेत्र आघाडीच्या अन्य सहकारी नगरसेवकांना दिली. नगराध्यक्षा व आरोग्य अधिकारी इतर कोणालाही विश्वासात न घेता एवढं बिल काढतात कसे ? हा तर सरळसरळ भ्रष्टाचार असून तो आपण उजेडात आणणार, असे सावंत यांनी माध्यमांना सांगितले आहे.
याबाबत त्यांनी मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यांनी माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळात औषध फवारणीचे बिल कधीही दोन लाख रुपयांच्या वर गेले नाही. मात्र आताच ते तीन पट का वाढले ? असा प्रश्न केला असून नगराध्यक्षा, आरोग्य अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी संगनमताने तब्बल पाच लाख रुपये काढून पालिकेची व वाईकरांची फसवणूक केली आहे. या सर्व संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. या निवेदनावर नगरसेवक राजेश गुरव व सौ. रेश्मा जायगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, तर नगरसेविका सौ.शीतल शिंदे यांनीही स्वतंत्र तक्रार केली असून नगराध्यक्षा, आरोग्य अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या धक्कादायक प्रकरानंतर शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. उपनगराध्यक्ष सावंत, नगरसेवक गुरव, जायगुडे व शिंदे यांच्या तक्रारीत जर तथ्य असेल तर हा मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |