12:50pm | Apr 26, 2021 |
पुसेगाव: कोरोनाचे वेगाने वाढणारे संक्रमण रोखण्यासाठी शासनास्तरावर प्रतिबंधक निर्बंधांसह लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र काही नागरीकांकडून या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी नामी शक्कल लढवत कार्यक्षेत्रातील बर्याच गावात सर्वांना विचारात घेऊन, प्रबोधनात्मक बैठका घेतल्याने जनता कर्फ्यू होऊन गावच्या गावच बंद राहिल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होण्यास मदत होत आहे.
पुसेगाव हे खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठ्या लोकसंख्येचे व मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. येथील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे 42 गावे व वाड्या वस्त्या यांचा समावेश होतो. बुध, डिस्कळ, राजापूर, नेर, वर्धनगड, विसापूर, कटगुण, खातगुण, निढळ, जाखनगाव, खटाव या गावातील नागरिकांचा कोणत्याही कारणाने पुसेगाव बाजारपेठेत दररोज वावर होत असतो. तसेच या भागातील कोविड केअर सेंटर पुसेगावात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. गत आठवड्यात पुसेगाव परिसरात कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. तरीही नागरिक या ना त्या कारणाने विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते.
शासनाने प्रतिबंधात्मक निर्बंध घालून ठरवून दिलेली दुकाने सुरूच होती. नागरिक मात्र विनाकारण खरेदी करण्यासाठी रस्त्यावर ये जा करत होते. कायद्याने हात बांधल्यामुळे बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचार्यांना ही अशा बेफिकीर नागरिकांच्या विरोधात काहीही करता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी कार्यक्षेत्रात असणार्या मोठ्या गावात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामस्तरीय सुरक्षा समिती, महसूल खाते, पोलीस पाटील, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक आयोजित करून प्रबोधनात्मक संवाद साधत लोकांनाच सर्वानुमते जनता कर्फ्यू करण्यास तयार केले. काही गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक स्वतः येऊन आमच्या गावात जनता कर्फ्यू करत असल्याची माहिती पोलिसांना देत आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु होत आहे.
पुसेगाव, निढळ, खातगुण, खटाव, बुध या गावात जनतेने च आता कोरोना रोखण्यासाठी कर्फ्यू जारी केला आहे. तर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वानुमते उर्वरित मोळ, डिस्कळ, नेर, वर्धनगड, व इतर गावात तातडीने अशा बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि चेतन मछले यांनी दिली.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |