कराड : येथील टिळक हायस्कूलचे नामवंत माजी विद्यार्थी व स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची १०९ वी जयंती टिळक हायस्कूलच्या प्रांगणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मकरंद किर्लोस्कर यांनी तयार केलेल्या 'धुरंधर समाजकारणी व अष्टपैलू राजकारणी यशवंतराव चव्हाण' या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मुख्याध्यापक जी.जी. अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक के.पी. वाघमारे, पर्यवेक्षक एस.एस. शिंदे, एस.यु. बाबर, तसेच उपशिक्षक जे.एस. पवार, कार्याध्यक्ष जी.एम. पवार, उपकार्याध्यक्ष पी.एस. मोरे यांची उपस्थिती होती.
जी.जी. अहिरे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण हे टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत, याचा शिक्षण मंडळ संस्थेला व टिळक हायस्कूलला सार्थ अभिमान आहे. सामान्य कुटुंबातील यशवंताने जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, उपपंतप्रधान अशी विविध पदे भूषवत टिळक हायस्कूलसह कराडचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचवला आहे.
जे.एस. पवार म्हणाले, अत्यंत खडतर प्रसंगातून यशवंतराव चव्हाण यांनी आपला जीवनक्रम चालू ठेवला होता. ते राजकारणी असले; तरीही उत्तम समाजसेवक व जाणकार साहित्यिक होते. याचा प्रत्यय त्यांच्या जीवनपट व साहित्यातून पाहायला मिळतो. स्वतःमध्ये परिश्रम करण्याची जिद्द असल्यास व्यक्ती कोणत्या उच्च पदावर पोहचू शकते; याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे विचार आजच्या शालेय विद्यार्थ्यांनी व युवकांनी आत्मसात केल्यास नव महाराष्ट्राची जडणघडण देशात प्रथम क्रमांकावर जाऊ शकते. यासाठी त्यांचे चरित्र वाचावे. त्यांच्या अंगी असणारे गुण आजच्या विद्यार्थ्यांनी, युवकांनी आत्मसात करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, माजी विद्यार्थी तेजस विजय खंडागळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्याचा टिळक हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तेजस खंडागळे यांनीही मनोगत व्यक्त केले. जी.एम. पवार यांनी सूत्रसंचालन केले तर पी.एस. मोरे यांनी आभार मानले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |