पुसेगाव: खटाव तालुक्यातील चोराडे, मायणी, चितळी तसेच पुसेगाव वडूज रस्त्यावर अनधिकृतपणे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. सदरील कामासाठी डांबरीरस्ता बेकायदेशीररीत्या उकरुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन स्वतःच्या फायद्यासाठी कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी काम केले आहे. या कामासाठी कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी करून देखील खटाव विभागाचे उपअभियंता शहाजी देसाई व कार्यकारी अभियंता एस.पी.दराडे हे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्राहक प्रबोधन समिती अध्यक्ष राजू मुळीक यांनी दिलेल्या निवेदनद्वारे केला आहे.
दिलेल्या निवेदनात श्री. मुळीक म्हणाले की, हे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी घेणे गरजेचे असते. सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या परवानगीमध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून 15 मीटरच्या बाहेर परवानगी दिलेली आहे. मात्र या रस्त्याच्या मधून खोदकाम करून केबल टाकली आहे. आम्ही अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे खटाव उपविभागीय देसाई यांच्याकडे केली असता संबंधित अधिकार्यांने आम्हांस उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली स्वतःची जबाबदारी ढकलून दिली. तर सातारचे कार्यकारी अभियंता एस. पी. दराडे यांना देखील दिली असता त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. नक्की हे काम कोणाचे आहे. आणि ह्यामध्ये अधिकारी वर्ग का दुर्लक्ष करत आहे हे समोर येणे गरजेचे आहे.
जर परवानगी देणारे अधिकारीच जर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्या ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा बेजबाबदार अधिकार्यांवर कर्तव्यात कसर केल्याबद्दल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत अन्यथा आम्ही दि.26 जानेवारी पासून खटाव तालुक्यातील बांधकाम विभागासमोर उपोषणाला बसणार असल्याचे राजू मुळीक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |