04:13pm | Aug 13, 2020 |
प्रकाश राजेघाटगे
बुध: संपूर्ण जगासह देशाला विळख्यात घेतलेल्या कोरोना विषाणूने देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आणत मानवाची जीवनशैलीही बदलली आहे. मोठ्या थाटामाटात होणारे विवाह सोहळे मोजक्यांच्याच उपस्थित होऊ लागले. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरचे कर्मकांडही करता येत नसल्याने कोरोनाने थेट रूढी- परंपरेलाही छेद दिला आहे. डोळ्याने न दिसणार्या एका विषाणूने घडवलेला बदल आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडत आहे.
सहा महिन्यांपूर्वी देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूने ऐतिहासिक बदल करीत सुरळीत चाललेल्या माणसाच्या आयुष्यालाही मोठे वळण दिले आहे. कोरोनाचा होणारा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने उपाययोजना करताना शासनाच्या नाकीनऊ येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग हा मुख्य पर्याय असल्याने गर्दी टाळण्यासाठी इतिहासात पहिल्यांदा बस, रेल्वे, विमानाची चाके थांबली आहेत.
मोठमोठे उत्सव, सण, विवाह सोहळे शासनाला रद्द करावे लागल्याने नेहमीच गर्दीत हरवून गेलेला माणूस सहा महिन्यांपासून एकाकी पडल्याचे जाणवत आहे. प्रत्येक धर्मातील अतिमहत्त्वाचे सण, सार्वजनिक उत्सव घरीच साजरे होताहेत. हजारोंच्या उपस्थितीत होणार्या लग्नसोहळ्यांना बोटावर मोजता येतील एवढ्यांचीच उपस्थिती पाहायला मिळतेय. यामुळे खर्चाची बचत होत असली तरी यावर अवलंबून असलेल्या मंडप, साउंड, केटरिंग, फोटोग्राफर, आचारी, ब्युटीपार्लर, डीजे यांसारख्या व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय.
हॉटेलच्या चटकदार जेवणाची चव आता घरच्या भाज्यांवरच भागवावी लागत आहे. फिजिकल डिस्टंन्सिंग पाळण्यासाठी जिवलगांचे आलिंगनही विस्मरणात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर अनेक धर्मांत पिढ्यानपिढ्या चालत आलेले मृत्यूनंतरचे कर्मकांडही कोरोनामुळे बंद झाले आहे. ना पिंडदान, ना दशक्रिया विधी, ना तेरवा, ना वर्षश्राद्ध. यामुळे थेट परंपरेलाच छेद बसत असल्याने नागरिकांचाही नाइलाज झाला आहे.
नातेवाईकही दुरावताहेत
सद्यःस्थिती ग्रामीण भागाबरोबरच शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे खेड्यातील पाहुणा ना शहरात जातोय, ना शहरातला खेड्यात. अत्यावश्यक कामासाठी कोणी आले तरी फिजिकल डिस्टंसिंगपायी दुरावा ठेवावा लागत असल्याने नातेवाइकांच्या भेटीही दुरापास्त झाल्यात.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |