पाटणा : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एका नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचं सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात 125 जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या.
दरम्यान काल (10 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता सुरु झालेली बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पहाटेपर्यंत सुरु होती. परंतु निकाल येण्यास विलंब होणार असल्याचं निवडणूक आयोगाने काल दुपारीच सांगितलं होतं. मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाने दुपारी आणि रात्री एक वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर आज पहाटे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला.
एनडीएमध्ये जागांबाबत बोलायचं झाल्यास भाजपला जेडीयूच्या पुढे आहे. भाजपला 74 जागा मिळाल्या असून जेडीयूला 43, व्हीआयपीला 4 आणि हमला चार जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनमध्ये राजदला 76, काँग्रेसला 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या आहेत.
मतांच्या टक्केवारीत सर्वाधिक 23.1 टक्के वोट शेअर राजदला मिळाले आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला 9.48 टक्के आणि डाव्यांना 1.48 टक्के मतं मिळाली आहेत. तर एनडीएमध्ये भाजपने 19.46 टक्के, जेडीयूने 15.38 टक्के मतं मिळवली आहेत.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल
एनडीए -125
भाजप - 74
जेडीयू - 43
विकासशील इन्सान पार्टी - 04
हिंदुस्तानी अवाम मोर्चा - 04
महागठबंधन - 110
राजद - 75
काँग्रेस - 19
भाकपा-माले - 12
सीपीएम - 02
सीपीआय - 02
याशिवाय एआयएमआएमने 5, बहुजन समाज पक्षाने एक, लोक जनशक्ती पक्षाने एक जागेवर विजय मिळवला आहे. तर अपक्षाच्या खात्यात एक जागा गेली आहे.
बिहारमध्ये राजडी सर्वात मोठा पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर
बिहारमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळालं असलं तर इथे राजद 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 74 जागा मिळाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकवर आहे. भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 21 जागांचा फायदा झाला आहे. 2015 च्या निवडणुकीत भाजपला 53 जागा मिळाल्या होता. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे. जेडीयूला यंदा 43 जागाच मिळवला आल्या. मागील निवडणुकीत जेडीयूला 71 जागा मिळाल्या होत्या.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |