08:47pm | Nov 24, 2020 |
कराड : कराड येथे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघा संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या चौघांकडून दोन मोटार सायकल, सत्तुर, तीन लाकडी दांडके, मोबाईल फोन असा 1 लाख 64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे यांनी आपल्या अधिपत्याखालील एक पथक तयार करुन कराड शहर व परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना, बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, कराड येथील ट्रान्सपोर्टचे व्यापारी यांना मारण्याची सुपारी त्यांच्याच गावातील इसमाने पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन सांगली येथील युवकांना दिली आहे. त्यांना मारण्याच्या उद्देशाने हॉटेल रॉयल पॅलेसच्या समोरील महामार्गावर चार इसम स्प्लेंन्डर मोटार सायकल व डीओ गाडीवर अंधारात दबा धरुन बसलेले आहेत. ही बातमी मिळाल्याने उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या बोगद्यात पथकाने सापळा रचला असता तेथे चारही इसम दोन मोटारसायकलवर संशयितरित्या वावरत असताना आढळुन आले. पोलीसांची चाहुल लागताच चौघांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेजण स्प्लेन्डर मोटार सायकल वरुन कोल्हापुर बाजुकडे पळून गेले, तर डीओ मोटार सायकलवरील दोघांंना जागीच पकडुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही चौघेजण कराड येथील व आटपाडी, जि.सांगली येथील इसमांचे सांगण्यावरुन कराड येथील ट्रक व्यापारी यास मारण्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी घेतली असुन, आज त्यास मारण्यासाठी आम्ही व सोबत स्लेन्डर मोटार सायकवरील दोन मित्रासोबत लाकडी दांडकी व सत्तुर असे साहित्य घेवुन आलेलो असल्याचे सांगीतले. पळुन गेलेल्या दोघांचा कराड व परिसरात शोध घेवुन त्यांनाही पोलिसांनी कराड परिसरातील पाचवड फाट्यावरुन ताब्यात घेतले.
या चारही जणांकडून दोन मोटार सायकल, सत्तुर, तीन लाकडी दांडके, मोबाईल फोन असा एकुण 1 लाख 64 हजार 373 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. याबाबतचा अधिक तपास कराड शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार सहा.पोलीस निरिक्षक आनंदसिंह साबळे, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, केतन शिंदे, रोहित निकम, संकेत निकम, मयुर देशमुख, मोहसिन मोमीण, महेश पवार, संजय जाधव यांनी सहभाग घेतला.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |