09:59am | Nov 05, 2020 |
कराड : तालुक्यातील तुळसण येथे मॉर्निंग वॉकला चाललेल्या दोन अल्पवयीन मुलींवर दुचाकीवर आलेल्या एकाने खुनी हल्ला केला असून या हल्ल्यात सोळा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळसण ता. कराड येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी दि. 3 रोजी पहाटे मॉर्निंगवॉक साठी निघाल्या होत्या. यावेळी गावापासून जवळच निर्मनुष्य रस्त्यावर तुळसणकडून दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या व्यक्तीने त्या दोन्ही मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला केला, यामध्ये एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तातडीने त्या मुलीस उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितलेला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर कोळेवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाला. घटनेच्यावेळी मॉर्निंगसाठी आलेल्या अन्य लोकांनी संबंधित हल्लेखोरास पकडण्याच्या प्रयत्न केला असता तो सापडला नाही. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहेत. दरम्यान भल्या सकाळी कराड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातून केली जात आहे.
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |

जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |