सातारा : कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाडीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. ही घटना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यामध्ये कसलीही सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीतीनूसार, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली कोल्हापूर-अर्नाळा (एमएच ०९ एफएल ९९८३) ही शयनयान एसटी रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आली. येथून काही वेळ थांबा घेऊन ही गाडी साडेनऊच्या सुमारास पुण्याच्या दिशेने रवाना झाली. गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किट झाले आहे, लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे गाडीतील सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी वेळेत पोहोचता आले. यामुळे कसलीही जीवित हानी झाली नाही.
त्यानंतर काही क्षणात गाडीने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली, असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. यानंतर एसटी चालक-वाहकांनी सातारा बसस्थानकाशी संपर्क साधून आगीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सातारा आगारातील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप पुन्हा सातारा बसस्थानकात आणण्यासाठी पर्यायी गाडीची व्यवस्था केली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |