12:52pm | Jan 15, 2021 |
कराड: कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या संविधान प्रचारक कार्यशाळेत सहभागी झालेल्या सामाजिक संस्था, संघटना आणि युवा प्रतिनिधींनी संविधान प्रचारक लोकचळवळीतून साक्षर नागरिक घडविण्याचा निर्धार केला. संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचूया, असा संदेशही या कार्यशाळेद्वारे देण्यात आला.
संविधान प्रचारक सातारा जिल्हा संयोजन गट व ज्ञानदिप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने आयोजित संविधान प्रचारक कार्यशाळेत सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटना आणि युवा प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत संविधान प्रचारक नागेश जाधव, संदिप आखाडे, वैशाली रायते, करिश्मा जाधव आणि ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विविध विषयांवर गट चर्चा करण्यात आली. यामध्ये संविधान निर्मितीचा इतिहास, संविधानाची प्रास्ताविका, न्याय-स्वातंत्र्य-समता-बंधुता याविषयावर मांडणी करण्यात आली. तर खेळातून संविधान निर्मितीचा इतिहास व संविधानाची गरज याविषयी प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर संविधानाप्रमाणे भारत कसा घडवावा, याबद्दल सखोल चर्चा झाली. भारत आणि भारतीय नागरिक घडण्याच्या या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी होवूया, असे आवाहन आनंदा थोरात यांनी केले. संस्थेचे संचालक मधुराणी थोरात व सुनीता डाईंगडे यांनी स्वागत केले.
अर्चना पाटील यांनी सुत्रसंचालन केले. बाजीराव पाटील यांनी आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |