सातारा : अस्मानी व सुलतानी संकटाचा शेतकरी वर्ग सामना करीत असतानाच खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील खंडाने घेतलेल्या शेतजमिनीतील एका शेतकऱ्याचे दोन एकर सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने जाळले. मात्र, पंचनामा करण्यासाठी कोणीही प्रतिसाद न दिल्याने सातारा जिल्हा शिवसेनेने महसूल विभागाचा जाहीर निषेध केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील मागासवर्गीय शेतकरी अधिक यादव यांचे शेत खंडाने घेऊन पत्रकार व शेतकरी पंकज कदम हे गेली चार वर्षे शेती करीत आहेत. जुलै महिन्यात त्यांनी सोयाबीन पेरले होते. पेरणी, नांगरट, भांगलन, काढणी अशी मशागत करण्यासाठी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार खर्च केला होता. शेतीमधील दोन एकरातील सोयाबीन पीक काढून मळणीसाठी ठेवले होते. शनिवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीने संपूर्ण सोयाबीन पेटवून दिला. यामध्ये एक लाख ते सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना समजताच शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विभाग प्रमुख मुघटराव कदम यांनी महारकी नावाच्या शिवारातील शेतामध्ये जाऊन पाहणी केली. किमान दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन काढून ठेवलेले पीक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले आहे. यावेळी त्या विभागातील मंडलाधिकारी, तलाठी यांना तातडीने फोन केले असता दोघांचेही फोन बंद लागले होते, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जाधव यांनी दिली.
शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यातून चालला असताना समाजात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. अशा ग्रामीण पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी समाजातील काही विकृत लोकांकडून असे प्रकार होत आहेत. याला आळा घालावा, अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे.
संबंधित महसूल विभागाने तात्काळ पत्रकार व शेतकरी पंकज कदम यांच्या मेहनतीने तयार केलेल्या सोयाबीन शेतीमधील या जळीताचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार व शेतकरी कदम यांना सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव प्रयत्न करीत आहेत. ज्याठिकाणी सोयाबीन पीक ठेवले होते, त्याच ठिकाणी जळीत प्रकरणाने पिकाची राख झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले होते. महसूल विभागाचे काही जण दिवाळी साजरी करण्यात गुंतले असले तरी त्यांनी साधा फोन उचलण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |