सातारा : साताऱ्यात सेव्हन स्टार इमारतीमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने शहरात खळबळ उडाली. सातारा पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिसर निर्मनुष्य केला. परिसरात बॉम्ब असल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. गर्दीला बाजूला करत अडगळीच्या ठिकाणी ठेवलेली बॉम्बसदृश वस्तू पोलिसांनी शिताफीने बाजूला केली. नागरिकांचे या प्रसंगाने श्वास रोखले गेले. मात्र हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शना अंर्तगत कायदा सुव्यवस्था सांभाळणे व पोलीस यंत्रणेची सतर्कता याचा सराव म्हणून शुक्रवारी सकाळी अत्यंत गोपनीय नियोजनबद्ध सराव घेण्यात आला. या कारवाईत बॉम्ब शोधक आणि नाशक पथक व दहशतवाद विरोधी पथक अशा पन्नास हून अधिक जवानांनी या सरावात भाग घेतला. सेव्हन स्टार इमारतीच्या समोरील वर्दळीच्या रस्त्यावर पोलीस वाहनांची गर्दी आणि जवानांची धावपळ यामुळे ये-जा करणारे नागरिक धास्तावले होते. बॉम्ब शोधक पथकाने वैशिष्टयपूर्ण तंत्राने एका बॅगमधील बॉम्ब सदृश्य वस्तू शोधून ती निकामी केली.
आपत्कालीन परस्थितीशी सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणेला सराव म्हणून सातारा बसस्थानकानजीक असलेल्या सेव्हन स्टार इमारतीत मॉक ड्रिल घेण्यात आले. इमारतीत बॉम्ब असल्याच्या अफवेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. हा डेमो असल्याचे पोलिसांनी सांगताच नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |